शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे तीनतेरा ; सातारा ग्रामीण भागातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 19:25 IST

आजही हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत व महसूल विभागाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

ठळक मुद्देशेतकरी वर्ग हैराण : खटाव तालुक्यातील ग्रामीण भागातील स्थिती; संबंधित अधिकऱ्यांनी लक्ष देण्याची गरज

पुसेसावळी : केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधान सन्मान किसान योजना अंमलात आणली असून, यातून शेतक-यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार आहेत; पण ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीमध्ये अपुºया सोयीसुविधा व कर्मचाºयांकडून होत असलेली टाळाटाळ यामुळे आजही हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत व महसूल विभागाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

केंद्र शासनाकडून शेतकºयांचा आर्थिक स्तर उंचविण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान योजना निर्माण केली; पण गेल्या कित्येक महिन्यापासून या योजनेचे पैसे शेतकºयांच्या खात्यावर जमा होत नाहीत. यास प्रशासनाचा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून केला जात आहे.

यापूर्वी शेतक-यांनी गावामध्ये असणा-या अधिक-यांकडे या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे जमा केली होती. मात्र, ही कागदपत्रे संगणकावर भरताना संबंधित संगणक चालकाकडून अनेक शेतक-यांची नावे, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक तसेच बँकांची नावे चुकविलीही आहेत.

त्यामुळे आज अनेक शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. तसेच ग्रामपंचायत कार्यालयात नेमलेल्या संगणक चालकांकडूनही शेतकरी वर्गाला उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. तसेच संगणकावर खाते क्रमांक बदलण्याची सोय नसल्यामुळे शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा होत नसल्याचे शेतकºयांकडून सांगितले जात आहे.

शेतक-यांच्या विकासासाठी असलेल्या या सन्मान योजनेचा अनेक शेतक-यांना लाभ मिळत नाही, त्यामुळे ही योजना म्हणजे शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखीच झाली आहे. त्यामुळे संबंधित महसूल व ग्रामपंचायत विभागाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.

  • शासकीय कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयात शेतकºयांच्या या सन्मान योजनेतील शासकीय कर्मचा-याकडून नजरचुकीने झालेल्या चुका सुधारण्यासाठी खासगी ग्राहक सेवा केंद्रात किंवा आॅनलाईन कॉम्प्युटर सेंटरमध्ये जाऊन ५० ते १०० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

 

  • अनेक शेतक-यांची बँक खाते नंबर चुकीचे सेव्ह झालेले आहेत. तरी या शेतकºयांचे चुकलेले खाते नंबर दुरुस्त झाल्याशिवाय या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शासनाने पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे आॅनलाईन पोर्टलमध्ये खाते नंबर दुरुस्त करण्यासंबंधीचे अपडेट करणे गरजेचे आहे.

    -प्रशांत पिसाळ,सामाजिक कार्यकर्ते.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgovernment schemeसरकारी योजना