शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

तीनशे मीटर रस्त्यासाठी राजकीय आखाडा !

By admin | Updated: June 29, 2015 00:29 IST

श्रेयवादात ग्रामस्थांचे हाल : पाटणकर गटाने मंजूर केलेले काम देसाई गटाने बंद पाडले; ‘बांधकाम’चेही कानावर हात

एकनाथ माळी -तारळे -येथील बसस्थानक ते कदम हॉस्पिटल दरम्यानच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने ‘रस्ता गेला खड्यात’ म्हणण्याची वेळ आली आहे. माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी मंजूर केलेल्या रस्त्याचे काम चुकीच्या पध्दतीने सुरू असल्याचा आरोप करीत देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी ते बंद पाडले. त्यावेळी दोन्ही गटात तु-तु मै-मै झाली. अधिकाऱ्यांनी बोटचेपी भूमिका घेतल्याने राजकीय वादात तीनशे मीटर रस्त्याचा बळी जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. येवू घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत तो कळीचा मुद्दा ठरणार आहे पाटण तालुक्यातील तारळे बसस्थानक ते कदम हॉस्पिटल रस्ता हा पाटण, घोट, ढोरोशी, जळव, बांबवडे, मुरूड, कडवे, सातारा या गावांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. दररोज हजारो प्रवासी, वाहने ये-जा करीत असतात. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजनाचा फटका मात्र सर्वांना सहन करावा लागत आहे. तेथील वाहतूकीचे अक्षरश: तीन तेरा वाजले आहेत. कदम हॉस्पिटलनजीक सुमारे एक ते दीड फूटाचा महाकाय खड्डा तयार झाला आहे. त्याठिकाणी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेथील मंजूर रस्ता राजकीय आखाड्यात अडकला असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र मूग गिळून गप्प आहे. मुख्य रहदारीचा मार्ग असलेल्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. खड्यांमधून रस्ता शोधण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांच्या प्रयत्नातून सुमारे चाळीस लाखांंचा निधी गतवर्षी नाबार्ड योजनेतून मंजूर झाला. आर. सी. सी. गटर व १२ मीटर रस्ता होणार होता. त्यासाठी एका बाजूच्या गटाराच्या बांधकामाला प्रारंभ झाला; पण रस्त्याची आखणी चुकीच्या पध्दतीने केली आहे. अतिक्रमणाच्या मुद्याला बगल देवून कुणाचे तरी हीत साधण्यासाठी चुकीचे काम सुरू आहे, असे म्हणत अ‍ॅड. बाळासाहेब जाधव अभिजित पाटील व देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याचे काम बंद पडले आहे. तारळे विभागातील लोकांच्या सोयीसाठी सुरू झालेले रस्त्याचे काम जाणूनबुजून बंद पाडले असल्याचा आरोप पाटणकर गटाने केला आहे. दोन्ही गटाच्या भांडणात रस्त्याचा मात्र बळी जावू नये अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राजकारणासाठी कायपण !तारळे ग्रामपंचायतीची निवडणूक जवळ आली आहे. त्यावेळी दोन्ही गटांकडून त्याचे राजकीय भांडवल करण्यात येणार यात शंका नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र कोणापुढे न झुकता निदान पावसाळ्यानंतर दोन्ही गटांच्या लोकांच्या म्हणण्यानुसार काम करून घ्यावे अन्यथा रस्त्यावर साठलेल्या खड्यात कोणाचा तरी बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता रहदारीसाठी महत्वाचा आहे. त्यादृष्टीने विचार होण्याची खरी गरज आहे. रस्त्याचे काम विनाकारण बंद पाडले आहे. लवकर अतिक्रमण काढू म्हणणारे गेल्या सहा महिन्यांपासून चिडीचूप बसले आहेत. स्वत: काही विकासकामे करता येत नाहीत आणि आम्ही आणलेली विकासकामे काहीतरी विघ्न आणून बंद पाडण्यात येत आहेत.- सदाशिव जाधव, जिल्हा परिषद सदस्य अतिक्रमण काढून रस्त्याचे काम सुरू केल्यास आमचा विरोध नाही. अधिकाऱ्यांबरोबर तीन वेळा बैठक झाली; पण सार्वजनिक बांधकाम विभागाने काही अतिक्रमणधारकांशी लागेबांधे असल्याने जाणून बुजून अतिक्रमणाला बगल दिली आहे. - अभिजित पाटील, उपतालुका प्रमुख, शंभूराज युवा संघटना