शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

वर्षात तीनशे जखमींना जीवदान!

By admin | Updated: December 7, 2014 00:46 IST

काळाने गाठलं की वेळेत पोहोचायचं : महामार्ग देखभालच्या कर्मचाऱ्यांची धाडसी ‘माणुसकी’

माणिक डोंगरे / मलकापूरअपघात म्हटलं की बघ्यांची गर्दी; पण मदत करणाऱ्यांची वानवा, असे चित्र दिसते. महामार्गावर तर हे चित्र रोजचेच. मात्र, महामार्ग देखभाल विभाग कर्मचाऱ्यांच्या माणुसकीमुळे आजपर्यंत अनेकांना जीवदान मिळालंय. २०१४ या एका वर्षात १४० अपघातांतील सुमारे ३०० जखमींना देखभालच्या कर्मचाऱ्यांमुळे वेळेत वैद्यकीय मदत पोहोचलीय. त्यामुळे त्या जखमींचा जीव बचावलाय. या धाडसी व समाजोपयोगी कार्याची दखल घेऊन पोलिसांसह रुग्णालयांनीही संबंधित कर्मचाऱ्यांचा वेळोवेळी सन्मान केला आहे.शेंद्रे ते पेठनाका हा पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचा ८४ किलोमीटरचा पट्टा अपघातप्रवण पट्टा समजला जातो़ कऱ्हाड तालुक्यातील ४५ किलोमीटरच्या पट्ट्यात सर्वाधिक अपघात घडल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे़ २०१४ या चालू वर्षात ८४ किलोमीटर पट्ट्यात एकूण १४० लहान-मोठे अपघात झाले आहेत़ त्यामध्ये ३४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे़ सुमारे ३०० जण जखमी झाले आहेत़ जखमींपैकी १५३ जणांना गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्या असून अनेकांना आपल्या शरीराचे अवयव गमवावे लागले आहेत़ १४७ किरकोळ जखमी झाले आहेत़ अपघात म्हटलं की मदत हा तातडीचा पर्याय जखमींच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो़ दिवसेंदिवस मदतीची भूमिका लोप पावत असल्यामुळे अपघातस्थळी बघ्यांची गर्दी जास्त होते़ अशा बाबींना छेद देत महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी मात्र अपघाताची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी जातात़ कोणाताही विचार न करता जखमींना तातडीने रूग्णालयात पाठवून देतात़ या त्यांच्या तत्पर सेवेमुळे २०१४ या एका वर्षात सुमारे ३०० जखमींना जीवदान मिळाले आहे़ जखमींना मदत करण्याचे काम हे कर्मचारी रात्री-अपरात्री व चोख पध्दतीने पार पाडत आहेत़ ही त्यांची कार्य तत्परता विचारात घेता कृष्णा रूग्णालयासह इतर रूग्णालय व पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले आह़े हीच माणुसकी समाजातील इतर तरूणांना आदर्श घेण्यासारखी आहे़