शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

प्रवीण जाधवच्या कुटुंबियांना धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 18:46 IST

Crimenews Satara : ऑलिम्पिक मध्ये तिरंदाजीत स्पर्धेत निवड झालेल्या प्रवीण जाधव याने त्याच्या कुटुंबियाला काही जण त्रास देत असून धमक्याही दिल्या असल्याचे सांगितल्याने याबाबत शासकीय यंत्रणा या प्रकरणाचा मागोवा घेत आहेत.

ठळक मुद्देप्रवीण जाधवच्या कुटुंबियांना धमकीसातारा जिल्ह्याचे एसपी अजयकुमार बन्सल यांच्याशी चर्चा

फलटण : ऑलिम्पिक मध्ये तिरंदाजीत स्पर्धेत निवड झालेल्या प्रवीण जाधव याने त्याच्या कुटुंबियाला काही जण त्रास देत असून धमक्याही दिल्या असल्याचे सांगितल्याने याबाबत शासकीय यंत्रणा या प्रकरणाचा मागोवा घेत आहेत.हरियाणा येथे सराव करीत असलेल्या प्रवीण जाधव यांनी तेथे पत्रकारांना दिलेल्या माहितीत सांगितले, की सरडे (ता. फलटण) गावातील एका कुटुंबातील पाच ते सहा लोक माझ्या घरी आले आणि त्यांनी माझी आई-वडील व काका-काकूंना धमकावण्यास सुरुवात केली.

जाधव यांच्या कुटुंबातील चार सदस्य झोपडीत राहत होते. मात्र, प्रवीण सैन्यात भरती झाल्यानंतर त्यांनी पक्के घर बांधले आहे. याआधी देखील त्यांनी अशा प्रकारे त्रास दिला होता. माझ्या शेजाऱ्यांना घरापुढून एक वेगळा मार्ग हवाय. त्यावर आम्ही त्यांना होकारही दिला होता. मात्र, आता त्यांनी हद्द केलीय.

त्यांनी माझ्या कुटुंबीयांना धमकी देण्यास सुरुवात केली असून यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. आम्ही घराची दुरुस्ती करणार असल्याने त्यांनी आम्हाला विरोध दर्शविला आहे, असेही त्याने सांगितले आहे. 

ऑलिम्पिकमधून परतल्यावर भारतीय तिरंदाजी संघातील खेळाडू थेट हरियाणातील सोनिपथ येथे गेले असून तिथे ते पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी सराव करणार आहेत.

प्रवीण पुढे म्हणाला, माझ्या कुटुंबीयांना खूप त्रास होत असून मी तिथे त्यांच्या सोबत नाही. याबाबत मी लष्करातील अधिकाऱ्यांशी बोललोय, असेही त्यांने सांगितले. याप्रकरणी कुटुंबीयांनी सातारा जिल्ह्याचे एसपी अजयकुमार बन्सल यांच्याशीही चर्चा केल्याचे समजते.

या तक्रारीची अद्याप पोलिसात नोंद झाली नसली तरी फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी  जगताप आणि उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी सरडे येथे जाऊन या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Satara areaसातारा परिसर