शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मुलीला पळवून नेण्याची धमकी; आरोपीला कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 14:30 IST

खेड तालुक्यातील भरणे शिंदेवाडी येथील एका अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या मोबाईलवर संपर्क साधून तिचा विनयभंग करतानाच तिला पळवून नेण्याची धमकी दिल्या प्रकरणी खेड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

ठळक मुद्देमुलीला धमकी; आरोपीला कारावासअतिरिक्त जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र सुनावणीअंती शिक्षा

खेड : तालुक्यातील भरणे शिंदेवाडी येथील एका अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या मोबाईलवर संपर्क साधून तिचा विनयभंग करतानाच तिला पळवून नेण्याची धमकी दिल्या प्रकरणी खेड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.परिमल चित्तरंजन रॉय (३५, आशीर्वाद कॅन्टीन, साकीनाका, मुंबई) हा काही वर्षांपूर्वी खेड - भरणे येथे एका चायनीज गाडीवर कामाला होता. यावेळी त्याची ओळख पीडित मुलीच्या वडिलांसोबत झाली. त्यानंतर चायनीज दुकानातील काम सोडल्यानंतर परिमल हा मुंबई येथे कामाला गेला. परंतु, जाण्यापूर्वी त्याने पीडितेच्या वडिलांचा मोबाईल नंबर घेतला होता.

मुंबईत काम करताना १५ जुलै २०१७ ते १७ आॅगस्ट २०१७ या कालावधीत परिमल याने सतत निरनिराळ्या फोनवरून पीडित मुलीच्या वडिलांच्या मोबाईलवर फोन केला व मुलीला पळवून नेण्याची धमकी दिली. पीडित मुलीने काही वेळेला फोन उचलला असता तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे बोलून पळवून नेण्याची धमकी दिली.याप्रकरणी पीडित मुलगी व तिच्या वडिलांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा शिंदे यांनी याप्रकरणी तपास करून परिमल याला गजाआड केले. खेड येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात त्याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सुनावणीअंती १८ जून रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. आवटे यांनी परिमल रॉय याला दोन वर्षे साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

टॅग्स :Courtन्यायालयSatara areaसातारा परिसर