शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

कऱ्हाडात हजारो मराठा बांधव रस्त्यावर, पदयात्रेस प्रतिसाद : तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 14:43 IST

मराठा आरक्षणासाठी रान पेटले असताना कऱ्हाडातही हजारो मराठा बांधव मंगळवारी रस्त्यावर उतरले. बांधवांनी तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा काढून त्याठिकाणी ठिय्या आंदोलन केले. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला.

ठळक मुद्देकऱ्हाडात हजारो मराठा बांधव रस्त्यावर, पदयात्रेस प्रतिसाद तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

कऱ्हाड  : मराठा आरक्षणासाठी रान पेटले असताना कऱ्हाडातही हजारो मराठा बांधव मंगळवारी रस्त्यावर उतरले. बांधवांनी तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा काढून त्याठिकाणी ठिय्या आंदोलन केले. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला.मराठा आरक्षणासाठी सध्या राज्यभर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. त्यातच आरक्षणासाठी जलसमाधी घेत काकासाहेब शिंदे यांनी बलिदान दिल्याने हा प्रश्न आणखीनच चिघळला आहे. मराठा बांधव आपल्या मागण्यांसाठी आक्रमक भूमिकेत असून, ठिय्या आंदोलन हा त्याचाच एक भाग आहे.

मंगळवारी कऱ्हाडात हजारो बांधव रस्त्यावर उतरले. त्यांनी सुरुवातीला आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या काकासाहेब शिंदे यांना अभिवादन केले. तसेच दत्त चौकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करीत पदयात्रेस प्रारंभ केला.

दत्त चौकातून ही पदयात्रा भेदा चौकमर्गो तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात आली. त्यामध्ये हजारो बांधवांसह विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. परळी-बीड येथील मराठा समाजबांधवांच्या आंदोलनास पाठिंबा देत आंदोलकांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

सकाळपासून शहरात मराठा बांधवांची चौकाचौकात गर्दी दिसून येत होती. तालुक्यातील युवक या आंदोलनासाठी दाखल झाले होते. तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आल्यानंतर काकासाहेब शिंदे-पाटील यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दिवसभर ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा समाजबांधवांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत राज्य शासनाचा जोरदार निषेध नोंदवला. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाSatara areaसातारा परिसर