शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

किसन वीर’कडून तेरा लाखांची मदत

By admin | Updated: October 18, 2016 00:48 IST

वारसांना धनादेश दिला : पाटखळ येथील मारुती शिंदे यांचा अपघाती मृत्यू

भुर्इंज : येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्प विभागात दुर्दैवी घटना घडून अपघाती मृत्यू झालेल्या पाटखळ, ता. सातारा येथील मारुती कृष्णा शिंदे यांच्या वारसांना कारखान्याच्या वतीने एकूण तेरा लाख सव्वीस हजार एकशे नव्याण्णव रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. त्यापैकी पाच लाख बावन्न हजार दोनशे ब्याण्णव रुपयांचा धनादेश त्यांची पत्नी वर्षा शिंदे यांच्याकडे कारखान्याचे संचालक चंद्रकांत इंगवले यांच्या हस्ते व अन्य संचालक, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व पाटखळ ग्रामस्थांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला. याबाबत शिंदे कुटुंबीय व उपस्थित ग्रामस्थांना माहिती देताना कारखान्याचे एचआर मॅनेजर अरविंद शिंगटे म्हणाले, ‘मारुती शिंदे यांचे दोन महिन्यांपूर्वी कारखान्यात अपघाती निधन झाले होते. सभासद आणि कारखान्याचे कर्मचारी केंद्रबिंदू मानून काम करणारे कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी शिंदे यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक ओढाताण होऊ नये यासाठी कायद्यानुसार आणि सामाजिक बांधिलकीतून सर्व ती आर्थिक मदत लवकरात लवकर करण्याची ग्वाही शिंदे कुटुंबीयांना दिलेली होती. त्यानुसार कारखान्याने नुकसान भरपाईची रक्कम सात लाख त्र्याहत्तर हजार नऊशे सात रुपये कामगार न्यायालयात भरलेली असून, ही रक्कम शिंदे कुटुंबीयांना न्यायालयामार्फत मिळणार आहे. त्याचबरोबर समूह जनता अपघात विमा, कर्मचारी अपघात विमा, कामगार सेवक कल्याण निधी आणि कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी स्वइच्छेने त्यांच्या पगारातून केलेली मदत अशी एकूण पाच लाख बावन्न हजार दोनशे ब्याण्णव रुपयांचा धनादेश मारुती शिंदे यांच्या वारसांना देण्यात आलेला आहे. कारखान्याचे संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी शिंदे कुटुंबीयांच्या पाठीशी असून, व्यवस्थापन भविष्यात त्यांना आवश्यक सहकार्य करेल.’ यावेळी कारखान्याचे संचालक प्रकाश पवार-पाटील, विजया साबळे, माजी संचालक नंदाभाऊ जाधव, अ‍ॅड. धनंजय चव्हाण, कार्यकारी संचालक ए. बी. जाधव, जयवंत साबळे, फायनान्स मॅनेजर टी. जी. पवार, एच. आर. मॅनेजर ए. टी. शिंगटे, चीफ इंजिनिअर आर. बी. जगदाळे, अ‍ॅग्री मॅनेजर एस. जे. कदम, को-जनरेशन इन्चार्ज डी. आर. वाघोले, मुख्य शेती अधिकारी विठ्ठलराव कदम, रमेश नलवडे, प्राजक्ता शिंदे, प्रसाद शिंदे, अशोक शिंदे, दत्तात्रय शिंदे, राजाराम शिंदे, वसंत डिगे, विनोद शिंदे, विश्वास शिंदे, गणपत शिंदे, मयूर शिंदे, सतीश शिंदे, भरत शिंदे, शरद शिंदे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)