वाई : वाईच्या कृष्णा नदीवरील पुलावरून उडी मारून अजित रमेश निषाद (वय १३, रा़ सिद्धनाथवाडी, वाई) याने आत्महत्या केली. या घटनेमुळे वाईमध्ये खळबळ उडाली असून, अजितने एवढे टोकाचे पाऊल का उचलले? याविषयी सर्वत्र चर्चा आहे.याबाबतची फिर्याद अजितच्या शेजारी राहणारे घन:शाम बडकन विश्वकर्मा यांनी वाई पोलिस ठाण्यात दिली आहे़ वाई पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी, दुपारी सव्वातीनच्या सुमारास कृष्णा नदीवरील पुलावरून अजितने उडी मारली. नदीत पाणी नसल्यामुळे तो खडकावर पडला. त्यामुळे त्याच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला. त्याने उडी मारताना काही नागरिकांनी पाहिले होते. नागरिकांनी पुलावरून नदीत उतरून अजितला बाहेर काढले. रुग्णवाहिका बोलाविल्यानंतर डॉक्टरांनी त्याला तपासले असता तो मृत झाल्याचे सांगितले. अजित हा वाई येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सातवीत शिकत होता़ रन, ता़ बासी उत्तरप्रदेश, सध्या रा़ सिद्धनाथवाडी वाई) हे खारी विकण्याचा व्यवसाय करत आहेत. अजित हा एकुलता एक आणि हुशार, शांत मुलगा म्हणून ओळखला जात होता. ऐन गुढीपाडव्यादिवशीच त्याने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे़ त्याने आत्महत्या का केली, याचे अद्याप पोलिसांना कारण समजले नाही. पोलिस त्याच्या वडिलांकडे आणि नातेवाइकांकडे चौकशी करत आहेत. (प्रतिनिधी)
पुलावरून उडी मारून तेरा वर्षांच्या मुलाची आत्महत्या
By admin | Updated: March 29, 2017 01:03 IST