जुळेवाडी गावापासून एका बाजूस व निर्मनुष्य ठिकाणी ही इमारत आहे. इमारतीच्या आजूबाजूस शेती आहे. तत्काळ संपर्क होईल, अशी राहती घरेही जवळ नाहीत. सहज भिंतीवरून प्रवेश करून चोरी करता येण्यासारखी परिस्थिती आहे. याचा फायदा घेऊन चोरटे उपकेंद्रात चोरी करीत आहेत. केंद्रातील आरोग्य तपासणी उपयोगी वस्तू, फर्निचर चोरटे लंपास करत आहेत. चोरीच्या प्रकाराने आरोग्य कर्मचारी वैतागले आहेत. त्यांच्यासमोर शासकीय कामकाज सोडून हा जादा व्याप वाढला आहे.
चोरीच्या प्रकारांना चाप लावावा, यासाठी वैद्यकीय अधिकारी, प्रशासन व पोलीस यंत्रणा प्रयत्नशील आहे. उपकेंद्रास ठोस सुरक्षा करणारी संरक्षक भिंत हवी आहे. ती भिंत उभारण्याची मागणी त्यांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. या प्रश्नी प्रशासनाने लक्ष घालून संरक्षक भिंत उभारावी, अशी मागणी होत आहे.