शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

Satara: आघाड्या जातील बासनात, पक्षीय झेंडे येतील हातात; कराड पालिकेत 'आघाड्यां'च्या राजकारणाला ब्रेक लागणार

By प्रमोद सुकरे | Updated: June 7, 2025 17:06 IST

पक्षीय राजकारणाला आलाय जोर, जो-तो झेंडा फडकवण्याचा करतोय दावा

प्रमोद सुकरेकराड : येथील पालिकेच्या राजकारणात आजवर अपवाद वगळता आघाड्यांचेच राजकारण पाहायला मिळाले आहे. पण बदलत्या राजकीय समीकरणांनुसार यंदा मात्र पक्षीय राजकारणाचा जोर वाढलेला दिसतोय. त्यामुळेच 'आघाड्या जातील बासनात अन् पक्षीय झेंडे येतील हातात' असे सध्याचे चित्र आहे. जो- तो आता पालिकेवर झेंडा फडकवण्याची भाषा करू लागला आहे. त्यामुळे कराड पालिकेवर नेमका कोणाचा झेंडा फडकणार? याबाबत राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहेत.दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या कराड नगरपालिकेला राजकीय दृष्ट्या वेगळे असे महत्त्व आहे. राजकीय पंढरी म्हणून ओळख असलेल्या या कराडचे सलग ४० वर्ष नगराध्यक्षपद भूषविलेल्या दिवंगत पी.डी. पाटील यांची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. पण त्यानंतर कराडच्या राजकारणावर एकहाती पकड ठेवण्यात कोणालाच फारसे यश आलेले दिसत नाही.

अशा आहेत आघाड्या

कराड पालिकेच्या राजकारणात माजी मंत्री बाळासाहेब पाटील  यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडी,भाजपचे आमदार डॉ.अतुल भोसले यांची कृष्णा विकास आघाडी, माजी नगराध्यक्षा शारदाताई जाधव व अरुण जाधव यांची जनशक्ती आघाडी, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांची यशवंत विकास आघाडी, माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील यांची लोकसेवा आघाडी अशा आघाड्या आजवर सक्रिय राहिल्या आहेत.

'आघाड्या' अन् 'कुरघोड्या'

पालिका निवडणुकीतील आघाड्या अन आघाड्यांच्या राजकारणातील कुरघोड्या कराडकरांना काही नवीन नाहीत. अनेकदा एकमेकांना टोकाचा विरोध करीत निवडणूक लढवलेले आणि निकालानंतर सत्तेत बसण्यासाठी एकत्र आलेले नगरसेवक कराडकरांनी पाहिले आहेत. तर ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली निवडणूक जिंकली त्यालाच निकालानंतर लगेच सोडचिट्टी देणारे नगरसेवकही कराडकरांनी पाहिले आहेत. त्यामुळे आघाड्या आणि त्यांच्या कुरघोड्या कराडकरांना नवीन नाहीत.

तेव्हा थेट नगराध्यक्ष निवडणुकीत कमळ फुलले

पालिकेच्या गत निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदासाठी भाजपने पक्ष चिन्हाचा प्रथमच वापर केला. भाजपला बहुमत मिळवता आले नाही.पण भाजपच्या रोहिणी शिंदे यांनी थेट नगराध्यक्षा पदासाठी बाजी मारली. त्यामुळे कराड पालिकेच्या इतिहासात प्रथमच 'कमळ' फुलले.

सर्वसाधारण आरक्षण पडले तर ...

कराड पालीकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण पुरुष पडेल असे गृहीत धरले जात आहे. पण तशा पद्धतीने आरक्षण पडले तर निवडणुकीत खूप मोठा संघर्ष पाहायला मिळेल. नगराध्यक्ष पदासाठी अनेक मातब्बरांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. त्यामुळे हे इच्छुक नेत्यांचे तरी ऐकतील का? हे सांगणे कठीण आहे.

पालिकेच्या निवडणुका ३ की ४ उमेदवारांच्या प्रभागा नुसार होणार याबाबत अजूनही संभ्रम आहे. त्यामुळे प्रभाग रचना कशी असणार व नगराध्यक्ष पदाचे आरक्षण काय असणार? यावर कराडची निवडणूक किती रंगतदार होणार हे ठरणार आहे.यांनी केलेत दावे

कराड नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवणार असा दावा भाजपचे आमदार व नूतन जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना केला आहे. दुसरीकडे शिंदेसेनेचे जिल्हा समन्वयक, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांनी देखील पालिकेवर भगवा फडकवणार असा दावा केला आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक पक्षीय पातळीवरच होईल असे मानले जात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडPoliticsराजकारणElectionनिवडणूक 2024