शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

आनेवाडी टोलनाक्यावर कदापिही मॉल नाही!

By admin | Updated: May 29, 2015 23:45 IST

जमीन फक्त टोलनाक्यासाठी आणि नियंत्रण कार्यालय, अपघातग्रस्त मदत करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेसाठीच संपादन

मुदगल : पुणे-बंगळूर महामार्गावरील कामांबाबतच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना; शेतकऱ्यांचा गैरसमज दूर करासातारा : राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणाचे कामकाज जलद गतीने पुर्ण करावे, असे आदेश देत आनेवाडी व विरमाडे येथील जमीन मॉल साठी नव्हे तर फक्त टोलनाक्यासाठी अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेसाठीच आवश्यक असेल तेवढी संपादीत करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाबाबत उड्डाण पुलांवरील चालू असलेल्या व बंद असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.बैठकीस राजेश कुंडल (प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग पुणे), भूसंपादन समन्वयचे उपजिल्हाधिकारीे अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी (महसूल) भारत वाघमारे, वाईचे प्रांताधिकारी रविंद्र खेबुडकर, सातारा उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री शिवणकर, माजी आमदार मदन भोसले आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, ज्या उड्डाण पुलाचे काम चालू आहे ते जून २०१५ पूर्वी पूर्ण करुन वाहतूकीसाठी सुरु करावेत. तसेच ज्या उड्डाण पुलाची कामे अद्याप सुरु झालेली नाहीत अशी कामे तात्काळ सुरु करावीत. महामार्गाच्या सहापदरीच्या ठिकाणी दिशादर्शक किंवा वाहतूकीचे सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. आनेवाडी व विरमाडे येथील टोल नाक्यासाठी जमीन संपादनाबाबत, मॉलसाठी मोठ्या प्रमाणात जमीन संपादन करण्यात येणार आहे अशी अफवा पसरल्याने त्याठिकाणी जमीन संपादन करण्यास स्थानिक शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणांत विरोध आहे. ती जमीन फक्त टोलनाक्यासाठी आणि नियंत्रण कार्यालय, अपघातग्रस्त मदत करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेसाठीच संपादन करण्यात येणार आहे.पुवीर्ची मोजणी आलेली रद्द करुन दुरुस्त मोजणी नकाशा सादर करण्यासाठी जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख यांना सुचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी म्हणाले, आनेवाडीमधील ० हेक्टर ६२ आर आणि विरमाडेमधील एक हेक्टर १२ आर ऐवढी जमीन संपादीत करावी. विरमाडे मधील स्थानिकशेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करुन झालेला गैरसमज दुर करावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी रविंद्र खेबूडकर यांना दिल्या. (प्रतिनिधी)उड्डाणपुलाबाबत प्रस्ताव सादर करापाचवड येथे किसनवीर सहकारी साखर कारखान्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांकडे २५ ते ३० गांवे असल्याने पाचवड येथे उड्डाणपुल व्हावे, अशी विनंती माजी आमदार मदन भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. याबाबत पोलिस यंत्रणा व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना वाहतूक व सदर रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांबाबतचा सर्व्हे करुन पाचवड या ठिकाणी उड्डाण पुला बाबत संयुक्तीक अहवाल सादर कराव्या, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.