शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

लोकइच्छेविरोधात शंभर फुटी रस्ता नाही

By admin | Updated: December 26, 2014 23:45 IST

पृथ्वीराज चव्हाण : कऱ्हाडकरांना संघर्ष करावा लागणार नाही

कऱ्हाड : ‘शहरातील मार्केट यार्ड ते दत्त चौक दरम्यानचा प्रस्तावित शंभर फुटी रस्ता लोकइच्छेविरोधात होणार नाही. पालिकेने त्याच्या विरोधात ठराव केला असेल, तर ते चांगलेच आहे; परंतु कऱ्हाडकरांना त्याबाबत संघर्ष करावा लागणार नाही. त्यांना अपेक्षित असेल तेवढाच रस्ता रुंदीकरण होईल,’ असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. कऱ्हाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे बोलत होते. यावेळी आमदार आनंदराव पाटील, ‘एनएसयूआय’चे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘आघाडी सरकार राज्यात सत्तेत असताना मंजूर केलेल्या कामात चाळीस टक्के कपात करण्याचा निर्णय आताच्या नव्या सरकारने घेतला आहे. त्यामुळे ज्याच्या वर्क आॅर्डर निघाल्या नाहीत, त्या कामांना अडचणी येऊ शकतात; पण कऱ्हाडसाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा मी प्रयत्न केला होता आणि कऱ्हाड दक्षिण मतदारसंघाच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहेच.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासात्मक बोलतात. आंतरराष्ट्रीय दौरे करतात. ही बाब चांगलीच आहे; पण त्यांचेच सहकारी धर्माधर्मात तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये करतात, हे देशाला परवडणारे आहे का, याचा विचार करणे गरजेचे आहे. हिंदुत्ववाद हेच भाजपचे मूळ तत्त्वज्ञान असल्याने मुस्लीम आरक्षण मंजूर झालेले नाही,’ असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची मागणीच मुळात चुकीची आहे. उत्साहाच्या भरात फडणवीसांनी ती केली खरी; पण त्याला मोंदींची मान्यता असल्याचा संदेश त्यातून गेला. मात्र, पंतप्रधानांची त्याला मान्यता नसल्याने तो विषय आता संपला आहे. परंतु मुंबईला स्वतंत्र दर्जा देण्याबाबतच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या की काय, अशी भीती मात्र निर्माण झाली आहे, असेही यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेला विविध मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी) अशी फाईल माझ्याकडे आलीच नव्हती !अजित पवार व सुनील तटकरे यांच्या सिंचन घोटाळ्याची चौकशी नवे सरकार तरी करणार का? याबाबत छेडले असता चव्हाण म्हणाले, ‘हा त्यांचा निर्णय आहे; पण त्याबाबतची कोणतीही फाईल मी मुख्यमंत्री असताना माझ्याकडे आली नव्हती,’ असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.उत्तरे द्यायला पाच वर्षे वेळनिवडणुकीदरम्यान आणि त्यानंतरही स्थानिक विरोधक तुमच्यावर टीका व आरोप करीत सुटले आहेत, त्याला उत्तरे कधी देणार? असे छेडले असता, ‘घाई कशाला करता उत्तरे द्यायला आता पाच वर्षे वेळ आहे. योग्यवेळी योग्य उत्तरे देईन,’ असे मिश्किल उत्तर त्यांनी दिले.