शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

वाईच्या मैदानात आता दुरंगी लढत

By admin | Updated: July 12, 2014 23:48 IST

नगराध्यक्ष निवड : शिंदेंच्या माघारीनंतर खामकर-गायकवाड आमने सामने

वाई : येथील पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी दाखल करण्यात आलेल्या तीन अर्जांपैकी माघार घेण्याच्या मुदतीत नगरसेविका शोभा शिंदे यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे तीर्थक्षेत्र आघाडीचे भूषण गायकवाड विरुध्द जनकल्याण आघाडीचे नंदकुमार खामकर यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. या निवडणुकीत दोन्ही काँग्रेस शेवटपर्यंत प्रयत्न करणार हे स्पष्ट झालेले आहे.शनिवारी दुपारी पावणेदोन वाजता नगरसेविका शोभा शिंदे यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे दोन आघाड्यात सरळ लढत होणार असे स्पष्ट झाले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर वाई नगरपालिकेची सत्ता हातात असणे महत्वाचे मानले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. १९ नगरसेवक असणाऱ्या या पालिका हद्दीत सुमारे २५ हजार इतके मतदान आहे. विधानसभा मतदारसंघासाठी वाई शहर व परिसरातील सुमारे ३७ हजार मतदान आहे. त्यामुळे पालिका नगराध्यक्ष निवडीत दोन्ही आघाड्याकडून जोरदार प्रयत्न होणार हे निश्चित आहे.पालिकेतील सत्ताधारी गटाला एकसंघ राखण्याचा प्रयत्न आमदार मकरंद पाटील यांनी केला आहे. ते स्वत: लक्ष घालत आहेत. दुसरीकडे जनकल्याण आघाडीचे आठ नगरसेवक असून त्यातील काही नगरसेवकांवर माजी आमदार मदन भोसले यांनी या निवडणुकीची जबाबदारी दिली असल्याचे बोलले जात आहे. त्यातच तीर्थक्षेत्र आघाडीचे नगरसेवक राजकीय सहलीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)