शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Udayanraje Bhosale: कायदाच शिल्लक राहिलेला नाही, अत्याचार करणाऱ्यांचे..; उदयनराजे संतापले -video

By सचिन काकडे | Updated: December 15, 2022 16:02 IST

मग ज्यांच्यावर अन्याय झाला आहे असा व्यक्ती करणार तरी काय?

सातारा : इतर देशांमध्ये कायदे किती कडक आहेत. आपल्याकडे देखील असे कायदे लागू करून चोरी करणाऱ्यांची बोटे छाटून टाका, बलात्कार करणाऱ्यांचे काहीही छाटून टाका. बघूया गुन्हा करण्याचे धाडस कोण करतोय? अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.सातारा नगरीचे संस्थापक छत्रपती शाहू महाराज यांच्या २७३ व्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यातील मराठा पॅलेस येथे गुरुवारी दुपारी आयोजित कार्यक्रमानंतर खा. उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबत छेडले असता ते म्हणाले, 'आज कायदा शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे अशा घटना कशा रोखता येतील? एखाद्या व्यक्तीने गुन्हा केल्यास तो पोलिसात जातो. पैशांच्या जोरावर आपल्या बाजूने चांगला वकील उभा करतो. मग ज्यांच्यावर अन्याय झाला आहे असा व्यक्ती करणार तरी काय?स्त्री म्हणजे आदिशक्ती असं आपण म्हणतोय; परंतु तिला जपण्याचं कामही आपल्याला करायला हवं. आज अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना वाढतायत. बाहेर देशात कायदे कडक आहेत. तिथे चोरी करणाऱ्यांचे हात छाटले जातात. आपल्याकडे असे कायदे लागू करून  बलात्कार करणाऱ्यांचं काहीही छाटून टाका, बघूया गुन्हा करण्याचे धाडस कोण करतोय? आज लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडत चालला असल्याचे ते म्हणाले.सीमावाद मिटायला हवामहाराष्ट्र - कर्नाटक सीमावादाबाबत खा. उदयनराजे म्हणाले, या वादात महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमेवर राहणाऱ्या लोकांची काय चूक आहे. सर्वात जास्त त्रास या लोकांनाच सहन करावा लागत आहे. माणुसकीच्या नात्याने सीमावादाचा प्रश्न तातडीने मार्गी लागायला हवा.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेWomenमहिला