सातारा : गोंदवले (ता. माण) आणि कऱ्हाड येथून अज्ञात चोरट्याने दोन दुचाकी लंपास केल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १३ फेब्रुवारी रोजी साडेआठ ते १४ रोजी सहा वाजेपर्यंत गोंदवले (ता. माण) येथून अज्ञात चोरट्याने घरासमोर पार्किंग केलेली दुचाकी (एमएच १० सीएफ - ८९६३) ही ६० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. याबाबत महेश मारुती शिरतोडे (वय ३६, रा. गोंदवले) यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस हवालदार केंगले तपास करीत आहेत.
दि. २८ रोजी नऊ ते सहा वाजण्याच्या दरम्यान कऱ्हाड (ता. कऱ्हाड) येथील चांभार गल्ली येथील अपार्टमेंटमध्ये पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरल्याची तक्रार वसीम शौकत तांबोळी (३७) यांनी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. तपास पोलीस हवालदार माने करीत आहेत.