शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

केवळ मित्राच्या इच्छेसाठी मोबाईलची जबरी चोरी -साताऱ्यात दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 21:52 IST

सातारा : मोबाईल खरेदी करण्यासाठी वेटर मित्राकडे पैसे नसल्याने रस्त्याने मोबाईलवर बोलणाऱ्या महिलेचा मोबाईल हिसकावल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी शनिवारी दोन तरुणांना ५० हजार रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली. दीपक शामराव पेटेकर (वय २२, रा. आसरे, ता. कोरेगाव) व अक्षय रमेश म्हेत्रे (२१, रा. कुमठे फाटा, कोरेगाव) अशी दोघा आरोपींची नावे आहेत.याबाबत ...

ठळक मुद्दे चार महिन्यांनंतर लागला तपास

सातारा : मोबाईल खरेदी करण्यासाठी वेटर मित्राकडे पैसे नसल्याने रस्त्याने मोबाईलवर बोलणाऱ्या महिलेचा मोबाईल हिसकावल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी शनिवारी दोन तरुणांना ५० हजार रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली. दीपक शामराव पेटेकर (वय २२, रा. आसरे, ता. कोरेगाव) व अक्षय रमेश म्हेत्रे (२१, रा. कुमठे फाटा, कोरेगाव) अशी दोघा आरोपींची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, दीपक पेटेकर हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर कोरेगाव, सातारा शहर पोलीस ठाण्यात चोरी व फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचा भाऊही मोक्कातील आरोपी आहे. अक्षय उंब्रज येथील एका हॉटेलमध्ये नोकरीला असून, त्याला मोबाईल खरेदी करायचा होता. मात्र, त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. ही बाब त्याने दीपकला सांगितली. दीपकने आपल्या मित्राची समस्या सोडवण्यासाठी ७ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बोलत चाललेल्या महिलेचा मोबाईल हिसकावला. त्यानंतर त्यांनी दुचाकीवरून धूम ठोकली.

याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात मुमताज शरीफ सय्यद (वय ३०, रा. शनिवार पेठ, सातारा) या महिलेने मोबाईल व सोन्याच्या चेनची जबरी चोरी झाल्याची फिर्याद दिली होती. पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक एस. सी. पोरे यांचे पथक गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या मागावर होते. दरम्यान, शनिवारी दोघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी मोबाईलची जबरी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी मोबाईल व चोरीसाठी वापरलेली दुचाकी (एमएच ११ सीएन १५६९) असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एस. सी. पोरे अधिक तपास करीत आहेत.या कारवाईत पोलीस नाईक संतोष महामुनी, भिसे, मुल्ला, नीलेश गायकवाड, साळुंखे, भोसले, अनिल स्वामी, अविनाश चव्हाण, ढाणे, धीरज कुंभार, भिसे यांनी सहभाग घेतला होता.सोन्याच्या चेनची चोरी झालीच नव्हती...तक्रारदार महिला कामाहून घरी येत होती. अंधारात चोरट्यांनी तिचा मोबाईल हिसकावला. मात्र, पोलीस मोबाईल चोरीची तक्रार घेणार नाहीत म्हणून तिने सोन्याची चेन चोरी झाल्याचे सांगितले. पोलीस तपासात चेनची चोरी झाली नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अखेर संबंधित महिलेने फक्त मोबाईलची चोरी झाल्याची कबुली दिली.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPolice Stationपोलीस ठाणे