सातारा : येथील गोडोली येथे घराजवळ उभी केलेली जीप अज्ञातांनी चोरून नेली. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कांतीलाल मंजी पटेल (वय ४६, रा. जय जलाराम निवास, ॲपेक्स हॉस्पिटलजवळ, गोडोली, सातारा) हे सॅनिटरी वेअर व्यावसायिक असून त्यांनी आपली पांढऱ्या रंगाची जीप (एमएच ११-एजी ३२८९) घराच्या गेटबाहेरील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मोकळ्या जागेत पार्क केली होती. मात्र, चोरट्याने शुक्रवारी (दि. २९) रात्री अकरा ते शनिवारी (दि. ३०) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लॉक तोडून चोरून नेली. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.