शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: घाटाई देवीच्या यात्रेसाठी भक्तांची अलोट गर्दी, हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी

By दीपक शिंदे | Updated: January 11, 2023 14:04 IST

जादा एसटी बसेसची सोय

पेट्री : घाटवण (ता. सातारा) येथील श्रीघाटाई देवीची यात्रा सालाबादप्रमाणे पौष कृष्ण संकष्टी चतुर्थीला भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडली. महाराष्ट्रातील असंख्य भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. नवस फेडण्यासाठी संपूर्ण परिसर नारळ, हार, तुरे, फुले, गुलाल, खोबऱ्याने नटून देवीच्या मंदिरावर रोषणाई केली होती. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राजू भोसले यांनी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करत मंदिराला प्रदक्षिणा घातल्या.लाखो भाविकांची कुलस्वामिनी, नवसाला पावणारी, स्वयंभू देवस्थान घाटाईदेवीच्या दोन दिवसांच्या यात्रेत पहिल्या दिवशी काकड आरती, अभ्यंगस्नान, अभिषेक, वस्त्रालंकार, देवीचे दर्शन कार्यक्रम उत्साहात झाले. सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, मुंबई विविध ठिकाणांहून भाविक देवीच्या छबिन्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. रात्री बारापर्यंत नित्रळ, सावली, कुरूळ, पाटेघर, कासाणी, आटाळी, रोहोट, वडगाव, कुडेघर, सह्याद्रीनगर, (सांगवी मुरा), आपटीमुरा गावांतून पालख्यांचे घाटाईदेवीच्या मंदिरात आगमन झाले.देवीची आरती करून ढोल, लेझीम, ताशाच्या गजरात घाटाई देवीच्या जयघोषाने रात्री बारा वाजता छबिन्याच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. अग्रस्थानी नंदी, सासन काठ्या, सर्व पालख्यांच्या समवेत देवीच्या छबिन्याच्या कार्यक्रमात भाविकांनी दर्शन घेतले. आवार्डे, ता. पाटण मानाच्या नंदीचे आगमन होऊन कासाणी, सह्याद्रीनगरमधील लेझीम पथके सहभागी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व पालख्यांना विडा दिला. संध्याकाळपर्यंत दुकाने गजबजलेलीच होती.यात्रेसाठी प्रशासकीय यंत्रणा, श्री घाटाईदेवी देवस्थान ट्रस्ट, विश्वस्त मंडळाच्या वतीने मोठ्या स्वरूपात तयारी होती. लहान मुलांची खेळणी, मिठाईची दुकानासह विविध दुकाने भाविकांच्या गर्दीने गजबजलेली होती. जादा एसटी बसेसची सोय केली होती. आरोग्य यंत्रणेसह पोलिस यंत्रणाही कार्यरत होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर