शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: 'लेकच हवी' सांगून ते गेले, अन् ती आली; पुसेसावळी हल्ल्यातील मृताच्या पत्नीने दिला मुलीला जन्म

By प्रगती पाटील | Updated: January 17, 2024 16:14 IST

जन्म झाल्यानंतर बाळाचं रडणे स्वाभाविक असते. सिझेरियन पद्धतीने रविवारी जन्मलेली अशनूर अन्य बाळांसारखी रडली नाही

प्रगती जाधव-पाटीलसातारा : ‘...त्यांची फार इच्छा होती मुलगीच व्हावी. रंगाने, नाकाने ती माझ्यासारखी असली, तरी गालावरची खळी आणि डोळे तुझे असावेत, असं ते सारखं बोलायचे. झालेही तसेच. रविवारी ‘तिचा’ जन्म झाला. पती आमच्यातून निघून गेले; मात्र ‘तिच्या’ रूपाने ते माझ्या आयुष्यात पुन्हा आले..’ आयेशा सांगत होती आपल्या एक दिवसाच्या लेकीची कहाणी..खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे १० सप्टेंबर २०२३ रोजी रात्री झालेल्या हल्ल्यात नुरुलहसन लियाकत शिकलगार (वय ३०) या अभियंता युवकाचा नाहक बळी गेला. ही दंगल उसळली तेव्हा नुरुलहसनची पत्नी आयेशा पाच महिन्यांची गर्भवती होती. दंगलीच्या आदल्या दिवशीच पती-पत्नी सोनोग्राफी करून आले होते. परतीच्या प्रवासात दोघांनीही बाळाविषयी एकमेकांची मते जाणून घेतली होती.मुलगा व्हावा, असं आयेशाला वाटत होते, तर नुरुलहसनला मुलीच्या प्रेमाची आस होती. दंगलीच्या आदल्या दिवशीच त्यांनी आपल्या बाळाविषयीची स्वप्ने रंगविली होती; मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. बाळाचा जन्म होण्यापूर्वीच नियतीने बाळाच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हिरावून घेतले. दंगलीत नुरुलहसनचा नाहक जीव गेला. त्यानंतर चार महिन्यांनी आयेशाची कऱ्हाडच्या खासगी रुग्णालयात प्रसूती झाली. तिने गोंड्स मुलीला जन्म दिला. आता लेकीच्या रूपाने पती नुरुलहसन पुन्हा आमच्या कुटुंबात आलेत, अशी आयेशाची भावना आहे. म्हणूनच तिने आयेशा आणि नुरुलहसन या दोन्ही नावांतून लेकीचं नाव ‘अशनूर’ ठेवलंय.

ती रडलीच नाही..!जन्म झाल्यानंतर बाळाचं रडणे स्वाभाविक असते. सिझेरियन पद्धतीने रविवारी जन्मलेली अशनूर अन्य बाळांसारखी रडली नाही. जन्म झाल्यापासून तिने तिच्या चैतन्यमयी हालचालींनी अवघ्या घराला नवी ऊर्जा प्रदान केली आहे. नुरुलहसनच्या जाण्याने आयुष्यात निर्माण झालेली पोकळी या चिमुकलीने अवघ्या दोन दिवसांत भरून काढली आहे.

 ‘अशनूर’ देणार जगण्याचं बळदंगलीने एका क्षणात होत्याचं नव्हतं करून टाकलं. २० नोव्हेंबर २०२२ ला नुरुलहसन आणि आयेशा यांचे लग्न झाले. ही दोघेही त्यांच्या पालकांची एकुलती एक अपत्य असल्याने दोन कुटुंबे एकत्रच नांदत होती. आयुष्याच्या माहेरची शेती करणे असो किंवा अन्य काही जबाबदाऱ्या असो त्या पार पाडण्यात नुरुलहसन कुठेही कमी पडत नव्हते. हसतं-खेळतं कुटुंब अवघ्या काही क्षणात विस्कटून गेले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर