शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी घटस्फोट देईना, सासऱ्याचा फोटो स्टुडिओ पेटवला!

By दत्ता यादव | Updated: March 14, 2024 22:20 IST

डिस्कळ येथील घटना; जावयासह तीन मित्रांना अटक.

सातारा : पत्नी घटस्फोट देत नसल्याच्या कारणावरून जावयाने तीन मित्रांना सोबत घेऊन सासऱ्याचा फोटो स्टुडीओ पेटवल्याचे पुसेगाव पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी जावयासह त्याच्या तीन मित्रांनाही अटक केली.

याबाबत पुसेगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डिस्कळ, ता. खटाव येथील पंचरत्न कॉम्प्लेक्समधील फोटो स्टुडीओला शुक्रवार, दि. ८ रोजी  रात्री अज्ञाताने आग लावून पळ काढला होता. या आगीत फोटो स्टुडीओचे मोठे नुकसान झाले होते. या प्रकरणाचा पुसेगाव पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर एका पुलावर चारचाकी गाडीचा अपघात होऊन ती भरधाव वेगाने निघून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून गाडीच्या नंबरवरून आरोपी निष्पन्न केले. त्यांना पोलिस ठाण्यात आणून चाैकशी केली असता हा प्रकार अशोक विठ्ठल यादव (वय ५१, रा. मोळ, ता. खटाव) यांचे जावई पृथ्वीराज प्रदीप गायकवाड (२४, रा. कार्वे, ता. कऱ्हाड) याने त्याचे मित्र योगेश संजय भोसले (२४, रा. उरण इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली), आकाश प्रभाकर शेळके (२४, रा. कार्वे, ता. कऱ्हाड), गौरव दिलीप थोरात (२३, रा. कार्वे) यांना सोबत घेऊन केल्याची कबुली दिली. फोटो स्टुडीओचे मालक यांची मुलगी घटस्फोट देत नसल्याच्या कारणावरून जावई पृथ्वीराज गायकवाड याने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले. संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक ऑंचल दलाल, कोरेगावच्या उपविभागीय पोलिस अधिकारी सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक चंद्रहार खाडे, पोलिस हवालदार योगेश बागल, पोलिस नाईक सुनील अबदागिरे, अशोक सरक, प्रमोद कदम, पोलिस कॉन्स्टेबल अविनाश घाडगे यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी