शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथ चळवळ वाढीसाठी ग्रंथसंपदा कपाटांचे वाण! आदर्श विचारांची मुहूर्तमेढ

By प्रगती पाटील | Updated: January 22, 2024 14:48 IST

शाहूपुरी विद्यालयात अनोख्या पद्धतीने संक्रांतीचा सण

प्रगती जाधव पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: मकर संक्रांतीच्या सणानिमित्ताने प्रत्येक वर्गासाठी एक अशा सहा छोटेखानी ग्रंथालयासाठी कपाटरुपी वाण लुटून एक आगळावेगळा मकर संक्रांतीचा सण साजरा केला. येथील राष्ट्रीय एकात्मता विकास कार्य संघ शाहूपुरी सातारा संचलित शाहूपुरी माध्यमिक विद्यालयात नुकताच हा अनोखा उपक्रम पार पडला.

प्रा. डॉ. मिरा दीक्षित यांच्या सहकार्यातून गीता गोडबोले ट्रस्ट नागपूरचे अनिल गोडबोले व वृषाली गोडबोले यांनी विद्यालयांतर्गत ग्रंथालय मित्रपरिवार अधिक सक्षम होण्यासाठी व बालमित्रांमधील वाचन संस्कृतीला बळ मिळावे यासाठी सांगली येथील अजित लिमये यांनी ग्रंथसंपदेचे वाण गोडबोले यांच्यासह लुटून संक्रांतीच्या सणाचा आनंद द्विगुणित केला.अनिल गोडबोले यांनी विद्यालयांतर्गत कार्यरत असलेला ग्रंथालय मित्रपरिवार या उदात्त हेतूने प्रेरित होऊन काम करीत आहे ही समाधानाची बाब असल्याचे प्रतिपादन केले. प्रा. डॉ. मिरा दीक्षित यांनी या अनुषंगाने बोलताना विद्यार्थ्यांमधील वाचन संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले. यावेळी भारत भोसले यांनी, शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचे भविष्य विचारांच्या पातळीवर घडविण्यासाठी म्हणून इयत्ता पाचवी ते दहावी अनुक्रमे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरुजी, कवी कुसुमाग्रज, कवयित्री बहिणाबाई चौधरी ग्रंथालय अशा एकूण सहा छोट्या - छोट्या ग्रंथालयांची निर्मिती विद्यालयांतर्गत करण्यात आली. 

याप्रसंगी शालाप्रमुख एस. एस. क्षिरसागर, ग्रंथालय मित्रपरिवार प्रकल्प मुख्य समन्वयक अभय भोसले, एम. आर. जाधव, एस. एम. बारंगळे, एन. ए. कांबळे, पी. एस. निंबाळकर, सी. जी. देशमुख, डी. डी. कुचेकर, परशुराम भोसले, राजेंद्र सगरे व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर