शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात घरगुती बाप्पांना भक्तीपूर्ण निरोप!, ‘पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष

By सचिन काकडे | Updated: September 5, 2022 19:04 IST

सातारा : ‘निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी’ अशा भावना व्यक्त करत सोमवारी ...

सातारा : ‘निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी’ अशा भावना व्यक्त करत सोमवारी जिल्हावासीयांनी पाच दिवसांच्या घरगुती गणरायाला भक्तीपूर्ण निरोप दिला. सातारा शहरात पालिकेच्या वतीने ठिकठिकाणी कृत्रिम तळ्यांची उभारणी करण्यात आली होती. या तळ्यात मूर्ती विसर्जन करून शाहूवासीयांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची परंपरा यंदाही कायम ठेवली.विघ्नहर्ता गणेशाची यंदा घरोघरी मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. दहा दिवस रंगणाऱ्या भक्तीच्या या मेळ्यामुळे सर्वत्र आनंदी वातावरण पसरले आहे. गणरायाची मनोभावे पूजा अर्चा करून सोमवारी पाच दिवसांच्या घरगुती बाप्पांना व गौराईला नागरिकांनी निरोप दिला.सातारा पालिकेकडून विसर्जनासाठी जलतरण तलावासह हुतात्मा स्मारक, कल्याणी शाळा, दगडी शाळा व बुधवार नाका येथे कृत्रिम तळ्यांची उभारणी करण्यात आली होती. या तळ्यात सकाळी सात वाजल्यापासून नागरिक मूर्ती विसर्जनासाठी येत होते. सायंकाळी पाच नंतर शहरातील काही सार्वजनिक मंडळाकडून पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. गणेश भक्तांकडून ‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करण्यात आला. या जयघोषाने अवघी शाहूनगरी दुमदुमून गेली. मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी सातारकरांनी राजपथावर गर्दी केली होती.पोलीस कर्मचाऱ्यांमुळे सोहळा निर्विघ्नजिल्हा पोलीस दलाकडून सातारा शहरात विसर्जन मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू नये याचे चोख नियोजन करण्यात आले होते. पोलिसांनी केलेल्या उत्तम नियोजनामुळे मिरवणूक सोहळ्यात कोणताही अडथळा निर्माण झाला नाही. पाच दिवसांच्या घरगुती बाप्पांचा विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGanesh Mahotsavगणेशोत्सव