शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

लंडनहून लवकरच वाघनखे साताऱ्यात येणार; जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी, संग्रहालय परिसरातील हातगाड्या हटवल्या

By सचिन काकडे | Updated: July 1, 2024 19:26 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे साताऱ्यातील संग्रहालयात ठेवली जाणार

सातारा : साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयाच्या आवारात लागलेली हातगाड्यांची रांग हळूहळू कमी होऊ लागली आहे. पालिकेने दिलेल्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर सोमवारी दुपारी येथील दहा विक्रेत्यांकडून आपल्या हातगाड्या स्वत:हून हटविण्यात आल्या. उर्वरित हातगाड्या हटविण्यासाठी हाॅकर्स संघटनेकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल; परंतु पालिकेने विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करावी, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे दहा महिन्यांसाठी साताऱ्यातील संग्रहालयात ठेवली जाणार आहे. काही दिवसांत ही वाघनखे लंडनहून साताऱ्यात येतील, असे पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे वाघनखे व संग्रहालयाच्या सुरक्षिततेत कोणतीही उणीव भासू नये, याची जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या विविध विभागांच्या बैठकीत संग्रहालयाच्या आवारातील हातगाड्या, टपऱ्या हटविण्याचा निर्णय घेण्यात आला.यानंतर पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून सर्व विक्रेत्यांना हातगाड्या हटविण्याबाबत सूचना देण्यात आल्या. सहकार्य न केल्यास संबंधित हातगाड्या पोलिस बंदोबस्तात हटविल्या जातील, असा इशाराही देण्यात आला होता. मात्र, आठ दिवसांत एकाही विक्रेत्याकडून हातगाडी हटविण्यात आली नाही. शिवाय काही राजकीय मंडळींकडून कारवाई न करण्याबाबत पालिकेच्या पथकावर दबावही आणला गेला. मात्र, सर्व विरोध झुगारुन पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक सोमवारी दुपारी यंत्रणेसह घटनास्थळी आले. यावेळी हातगाडीधारकांनी सहकार्याची भूमीका दाखवत दहा हातगाड्या स्वत:हून हटविल्या.

विरोध नाही.. सहकार्याची भूमिकावाघनखे येणार ही सातारकरांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पालिकेने दिलेल्या सूचनांप्रमाणे आज दहा हातगाडीधारकांनी आपल्या गाड्या स्वत:हून हटविल्या. उर्वरित हातगाड्या काढण्यासाठी हाकर्स संघटनेचे प्रशासनाला संपूर्ण सहकार्य राहील. हातगाडीधारकांवर किमान दहा महिने उपासमारीची वेळ येणार असल्याने त्यांचे पर्यायी जागेत स्थलांतर करावे, अशी मागणी सर्वधर्मिय सुशिक्षित बरोजगार हॉकर्स संघटनेचे सातारा शहर अध्यक्ष संजय पवार यांनी पालिका प्रशासनाकडे केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज