शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई महामार्गावर बर्निंग बसचा थरार, सातारा जवळ आनेवाडी येथे महामंडळाची विठाई बस जळून खाक

By दीपक शिंदे | Updated: June 12, 2023 15:53 IST

सातारा- पुणे बंगलोर आशियाई महामार्गवर आनेवाडी गावच्या जवळ असणाऱ्या उड्डाणं पुलावर महामंडळाच्या विठाई बसने अचानक पेट घेतल्याने अवघ्या २० मिनिटात ...

सातारा- पुणे बंगलोर आशियाई महामार्गवर आनेवाडी गावच्या जवळ असणाऱ्या उड्डाणं पुलावर महामंडळाच्या विठाई बसने अचानक पेट घेतल्याने अवघ्या २० मिनिटात संपूर्ण बस जळून खाक झाली. सूदैवाने चालक वाहकांच्या प्रसंगावधानाने सर्व प्रवाशी बस मधून सुखरूप उतरल्याने जिवीत हानी झाली नाही. सकाळी साडे अकरा वाजता ही घटना घडली.

राधानगरी-कोल्हापूर वरून स्वारगेटकडे निघालेली विठाई बस क्रमांक एम एच १३ ८४१३ क्रमांकांची बस पुणे बंगलूर आशियाई महामार्गावरून येत असताना येथील आनेवाडी टोल नाक्याच्या अगोदर असणाऱ्या आनेवाडीच्या उड्डाण पुलावर बसच्या इंजिन मधून धूर येऊ लागल्याचे चालक सागर चौगुले यांना दिसले. क्षणात त्यांनी बस थांबवून वाहक सोनल चौगुले यांच्यासह सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरविले,काही वेळातच संपूर्ण बस जळून खाक झाली. महामार्गावर यावेळी धुळीचे लोट पहाव्यास मिळाले. बस मध्ये  यावेळी चाळीसहून अधिक प्रवासी प्रवास करीत होते.

संपूर्ण बस जळून खाक झाल्या नंतर सातारा नगरपरिषदेचा अग्निशमक बंब घटनास्थळी दाखल झाला. यावेळी भुईंज पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवून वाहतूक सेवा रस्त्यावरून वळविली होती. आनेवाडी टोल नाका येथे अग्निशमक बंब कायम स्वरूपी असावा अशी मागणी करण्यात येत आहे.