शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या तयारीतील तिघांच्या मुसक्या आवळल्या; सातारा शहर पोलिसांची कारवाई

By नितीन काळेल | Updated: May 31, 2024 22:43 IST

धारदार हत्यार, एअर पिस्टल, चोरीची दुचाकी जप्त.

सातारा : सातारा शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या तिघा तरुणांना शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडले. संबंधितांकडून धारदार हत्यार, एअर पिस्टल, मोबाइल, चोरीची दुचाकी आदी मिळून सवा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर या टोळीकडून चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आँचल दलाल आणि पोलिस उपअधीक्षक राजीव नवले यांनी सातारा शहरातील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची सूचना शहर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांना केली होती. त्यानुसार दि. ३० मे रोजी रात्रीच्या वेळी शहर ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक शहरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी औद्योगिक वसाहत परिसरात लुटमार करून दरोडा टाकण्याच्या तयारीत काही जण असल्याचे पथकाला समजले. त्यानुसार पथकाने सापळा रचून शोध सुरू केला. तेव्हा औद्योगिक वसाहतीत एका कंपनीसमोरील मोकळ्या जागेत काही तरुण विना क्रमांकाच्या दुचाकीवर संशयितरीत्या दिसून आले. पोलिस येत असल्याचे पाहून ते पळून जाऊ लागले; पण पोलिसांनी पाठलाग करून पकडले, तर एक तरुण अंधारात झाडाझुडपातून पळून गेला.

निखिल राजू बडेकर (वय १९, रा. अमरलक्ष्मी शेडगेवस्ती, सातारा), ऋषिकेश शशिकांत पवार (वय १९, रा. काळोशी-कोडोली, ता. सातारा) आणि योगेंद्र ओमपाल शर्मा (वय २०, रा. झेंडा चाैक चंदननगर, सातारा) अशी त्यांची नावे असल्याचे समोर आले, तसेच एक विधिसंघर्ष बालकही यामध्ये दिसून आला. पोलिसांनी विचारणा केल्यावर संबंधितांनी औद्योगिक वसाहत परिसरात वाटसरूंना अडवून हत्याराची भीती दाखवून लुटमार करणार असल्याचे सांगितले. पोलिस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. चार गुन्हे उघडकीस... पोलिसांनी संशियतांकडे चाैकशी केल्यावर शहर ठाण्यातील चार गुन्हे उघडकीस आले. साताऱ्यातील पोवई नाक्यावर तरुणास कोयत्याने मारहाण करणे, देगाव रस्ता येथे हत्याराने मारहाण तसेच दुचाकी चोरीचे दोन गुन्हे केल्याची कबुली संशयितांनी दिली. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर