शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

शिक्षकाचे कुटूंब बाहेर गेले; भरदिवसा घर फोडून दहा लाखांवर डल्ला

By नितीन काळेल | Updated: March 15, 2024 13:56 IST

अज्ञातावर गुन्हा : पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू; सोन्याचे दागिने लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा शहराजवळील खेड येथे घरात कोणी नसल्याचा फायदा घेत भरदविसा कडी तोडून १० लाखांहून अधिक किंमतीचा एेवज लंपास करण्यात आला. यामध्ये सोन्याचे २९ तोळे दागिने, रोख रकमेचा समावेश आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा नोंद झाला आहे. तर पोलिसांनी विविध पातळीवर चोरट्याचा शोध सुरू केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी बापूराव बाबूराव सोनवलर (रा. खेड, सातारा. मूळ रा. भाडळी खुर्द, ता. फलटण) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार दि. १३ मार्च रोजी सकाळी साडे आकरा ते सायंकाळी साडे पाच वाजेच्या दरम्यान चोरीचा हा प्रकार घडला. तक्रारदार हे शिक्षक असून ते व त्यांच्या कुटुंबातील सर्वजण बाहेर गेले होते. यादरम्यान, अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरुममधील लाकडी कपाटाच्या ड्रावरमधील सोन्याचे २९ तोळे आणि ६ ग्रॅम वजनाचे दागिने चोरले. तसेच यावेळी चोरट्यांच्या हाती रोख रक्कमही लागली. या चोरीनंतर संशियतांनी पलायन केले. सायंकाळी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. त्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली.

या घटनेत ९ लाख २९ हजार ५०० रुपयांचा एेवज चोरीस गेला असल्याचे तक्रारीत स्पष्ट केले आहे. तरीही आजच्या भावानुसार सोन्याचा दर अधिक आहे. त्यामुळे या चोरीत १० लाखांहून अधिक रकमेचा एेवज लंपास झाला आहे. याबाबत सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक जाधव हे तपास करीत आहेत.

सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार...ही चोरी दिवसा झाली आहे. जवळपास कोणी नसल्याचे पाहून हा प्रकार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आलेले आहे. पोलिसांनी आता सीसीटीव्हीचे फुटेज मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामाध्यमातून चोरट्याचा शोध घेतला जात आहे. तसेच पोलिसांनी विविध पातळीवरही चोरट्याचा तपास सुरू केलेला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी