शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

Satara: म्हाळसा-खंडोबा यांचा शाही विवाह सोहळा २ जानेवारीला पालला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 19:45 IST

शाही विवाह सोहळा गोरज मुहूर्तावर होणार. यासाठी लाखो वऱ्हाडी येणार

उंब्रज : ‘पाल (ता. कराड) येथे श्री खंडोबा-म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा २ जानेवारी रोजी गोरज मुहूर्तावर होणार आहे. यासाठी लाखो वऱ्हाडी येणार आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी,’ असे निर्देश प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिले.पाल येथे खंडोबा यात्रेच्या पहिल्या पूर्वनियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार कल्पना ढवळे, नायब तहसीलदार बी. के. राठोड, देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, मोटार वाहन अधिकारी धनंजय हिले, उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे, देवस्थानचे संचालक, यात्रा समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.प्रमुख मानकरी देवराज पाटील यांनी यात्रा शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी भाविकांनी देवस्थान ट्रस्ट, यात्रा समिती व ग्रामपंचायत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले. यात्रेच्या नियोजनात कालानुरूप बदल करण्यात आले असून, भाविकांच्या स्वागतासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एसटी स्टँडचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी केली.तहसीलदार कल्पना ढवळे यांनी प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी चोख पार पाडावी व नागरिकांकडून येणाऱ्या सूचनांची दखल घ्यावी, असे सांगितले. यात्रेदरम्यान ३७० एसटी बसेसची व्यवस्था करण्यात येणार असून, महावितरणकडून ३० कर्मचाऱ्यांची टीम तैनात राहणार आहे. तसेच अनधिकृत वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. आप्पासाहेब खंडाईत यांनी आभार मानले.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Mhalasa-Khandoba Royal Wedding Ceremony on January 2 in Pal

Web Summary : The royal wedding of Khandoba-Mhalasa will be held in Pal on January 2nd. Authorities are coordinating to ensure convenience for devotees attending. Key figures emphasized cooperation for a smooth, disciplined event, urging attention to facilities and addressing transportation issues. 370 ST buses will be arranged.