शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस पुन्हा वाढला; नवजाला ५५ मिलीमीटरची नोंद! 

By नितीन काळेल | Updated: July 11, 2024 20:41 IST

साताऱ्यात उघडीप कायम : कोयना धरणात ३३ टीएमसीवर पाणीसाठा 

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात कमी झालेला पाऊस पुन्हा वाढू लागला आहे. गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक ५५ मिलीमीटर पर्जन्यमान झाले. तर कोयनानगर येथे ३० आणि महाबळेश्वरला २२ मिलीमीटरची नोंद झाली आहे. कोयना धरणातील पाणीसाठाही ३३ टीएमसीवर पोहोचला आहे. तर सातारा शहरात पावसाची उघडीप कायम आहे.

जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून पाऊस पडत आहे. आतापर्यंत बहुतांशी भागात पावसाने चांगली हजेरी लावलेली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीला वेग आला. तसेच भात लागणही जोरात सुरू आहे. त्यातच जुलै महिना सुरू झाल्यापासून पाऊस वाढला. मात्र, मागील दोन दिवसांपूर्वी जोर कमी झाला होता. पण, बुधवारपासून पुन्हा पश्चिम भागात पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. त्यामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागलेत.

गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे ५५ मिलीमीटर पाऊस पडला. तर एक जूनपासून आतापर्यंत १ हजार ७६३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयनानगर येथे आतापर्यंत १ हजार ५९३ तर महाबळेश्वरला १ हजार ३७४ मिलीमीटर पाऊस झाला. तसेच तीन दिवस कोयना पाणलोट क्षेत्रातही जोर कमी होता. त्यामुळे कोयना धरणातील आवक कमी झाली आहे. गुरूवारी सकाळच्या सुमारास धरणात ६ हजार ६२० क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ३३.०३ टीएमसी झालेला. धरण भरण्यासाठी अजूनही सुमारे ७२ टीएमसी पाण्याची गरज आहे.

सातारा शहरात चार दिवसांपासून पावसाची उघडीप आहे. गुरूवारी सकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यानंतर सातारकरांना सूर्यदर्शनही झाले. तर माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा आदी तालुक्यात पावसाची उघडीप आहे. कधीतरी एखादी सर येऊन कोसळत आहे.

धोम, कण्हेर, तारळी धरणक्षेत्रात पावसाची पाठ...जिल्ह्याच्या पश्चिम भागात प्रमुख आणि मोठे सहा पाणीप्रकल्प आहेत. या धरणक्षेत्रातही पावसाची पाठ असल्याचे दिसून आलेले आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढत नाही. गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरणक्षेत्रातच ३० मिलीमीटर पाऊस झाला. तर बलकवडी २ आणि उरमोडी धरणक्षेत्रात १२ मिलीमीटरची नोंद झाली. पण, धोम, कण्हेर आणि तारळी धरण पाणलोट क्षेत्रात २४ तासांत काहीही पाऊस झालेला नाही. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर