शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका, कोयना धरणाचा पायथा वीजगृह पडला बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 10:49 IST

४० मेगावॅट वीज निर्मिती ठप्प.

निलेश साळुंखे कोयनानगर : वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा पहिला फटका कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाला बसला आहे. पायथा गृहातून होणारी वीज निर्मिती ठप्प झाली असून वीज निर्मितीनंतर सिंचनासाठी सोडले जाणारे पाणीही बंद झाले आहे. सिंचनासाठी गरज भासल्यास बुधवारी दुपारी धरणाचे वक्र दरवाजे उघडले जाण्याची शक्यता व्यवस्थापनाकडून वर्तविण्यात आली आहे.राज्यातील ८६ हजार वीज कामगार, अभियंते, अधिकारी तसेच ४२ हजार कंत्राटी कामगार, सुरक्षारक्षकांनी ७२ तासाचा संप पुकारला आहे. त्यामुळे तीन दिवस महाराष्ट्र अंधारात जाण्याची शक्यता मंगळवारी रात्रीपासून वर्तवली जात होती. वीज वितरणच्या खाजगीकरणाला विरोध म्हणून हा संप पुकारण्यात आला आहे. त्यातच महावितरणने महत्त्वपूर्ण माहिती देत संप असला तरी वीजपुरवठा सुरळीत राहील, असे आश्वासित केले होते. मात्र, बुधवारी रात्रीच संपाचा पहिला फटका कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाला बसला. पायथा वीजगृहातून प्रति सेकंद ४० मेगावॕट वीजनिर्मिती करून २१०० क्यूसेक्स पाणी नदीपात्रात सोडले जाते.

मात्र संपामुळे बुधवारी रात्री नऊ वाजता पायथा वीजगृह बंद पडला. वीजगृहातून तयार होणारी ४० मेगावॕट वीज निर्मिती बंद झाली आहे. तसेच नदीपात्रात सोडले जाणारे २१०० क्युसेक्स पाणीही बंद करण्यात आले आहे. वीज निर्मिती बंद पडल्यामुळे त्याचा मोठा फटका बसणार आहे. त्यातच सिंचनासाठी धरणातून सोडले जाणारे पाणीही बंद झाल्याने नदीपात्राची पाणी पातळी कमी होणार आहे. सिंचनासाठी आवश्यकता भासल्यास धरणाचे वक्र दरवाजे उघडून बुधवारी दुपारनंतर नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता धरण व्यवस्थापनाकडून वर्तविण्यात आली आहे.

टॅग्स :electricityवीजStrikeसंप