शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

Satara: तासवडेतील एमआयडीसीत ‘सुर्यप्रभा’मध्ये चाले खेळ ‘केमिकल’चा!, इमारतीच्या भिंतीही चक्क काचेच्या 

By संजय पाटील | Updated: May 29, 2025 16:35 IST

कंपनी खताची; डोस ‘कोकेन’चा : आठवड्यातून एकदा मालक यायचा, तिघांना घेवून कोकेन बनवायचा

संजय पाटीलकऱ्हाड : तासवडे, ता. कऱ्हाड येथे ‘सुर्यप्रभा फॉर्माकेम’ ही कंपनी २०१७ साली सुरू झाली. या कंपनीची इमारतच कोट्यावधी रुपये किमतीची असून इमारतीच्या भिंतीही चक्क काचेच्या आहेत. कंपनीचा मालक आठवड्यातून एकदाच कंपनीत यायचा आणि ठराविक साथीदारांना सोबत घेवून ‘कोकेन’ निर्मितीचा उद्योग करायचा, अशी माहिती आता उघडकीस येत आहे.तासवडेतील सुर्यप्रभा कंपनीतून पोलिसांनी १ किलो २७० ग्रॅम वजनाचे ६ कोटी ३५ लाखांचे कोकेन जप्त आहे. तसेच याप्रकरणी कंपनीचा मालक अमरसिंह देशमुख याच्यासह इतर चौघांवर गुन्हा दाखल करुन त्यापैकी तिघांना अटक केले आहे. अमरसिंह देशमुख याला तेलंगणा राज्यात यापुर्वीच दुसऱ्या एका अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. अमरसिंह देशमुख याने २०१७ साली तासवडे औद्योगिक वसाहतीत ‘सुर्यप्रभा’ ही कंपनी उभारली. या कंपनीचा खत निर्मितीचा परवाना आहे. मात्र, खताच्या नावाखाली येथे ‘कोकेन’ बनविले गेल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या कारवाईतून समोर आली.तेलंगणा राज्यातील श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थप्रकरणी १५ मे रोजी अमरसिंह देशमुख याला तेथील स्थानिक पोलिसांनी अटक केले. त्यानंतर त्याच्याकडे करण्यात आलेल्या तपासात तासवडेच्या ‘सुर्यप्रभा’ कंपनीतील ‘कोकेन’चा भांडाफोड झाला.

तेलंगणा पोलीस तासवडेत!तेलंगणा पोलीस या तपासासाठी पाच ते सहा दिवसांपुर्वी तासवडेतही येवून गेल्याची चर्चा आहे. मात्र, त्यानंतर स्थानिक पोलिसांनी कारवाई करीत सुर्यप्रभा कंपनीवर छापा टाकून ‘कोकेन’ हस्तगत केले.

कामगारांना माहितीच नव्हतं?सुर्यप्रभा कंपनीत पंधरा ते वीस कामगार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यापैकी केवळ ठराविक जणांनाच ‘कोकेन’बद्दलची माहिती होती. इतरांना केमिकलचा हा ‘खेळ’ नेमका काय आहे, याची कसलीच कल्पना नव्हती, असे पोलीस सांगतात.  

मुख्य सुत्रधार अमरसिंह, ‘मास्टरमार्इंड’ शिफणकर!

  • कोकेन प्रकरणात सुर्यप्रभा कंपनीचा मालक अमरसिंह देशमुख हा मुख्य सुत्रधार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
  • तसेच या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार लेला विश्वनाथ शिफणकर हा कोकेन तस्करीचा ‘मास्टरमार्इंड’ असल्याचे बोलले जात आहे.
  • अमरसिंह देशमुख व विश्वनाथ शिफणकर या दोघांनी नियोजनबद्धरित्या कोकेन तयार करुन ते बाहेर पाठविल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

तासवडेत बनवून दौंडमध्ये ‘पॅकिंग’कोट्यावधी रुपयांचे कोकेन तासवडे औद्योगिक वसाहतीतील सुर्यप्रभा कंपनीत बनविले जायचे. तेथून ते दौंड येथे विश्वनाथ शिफणकर याच्याकडे पाठवले जायचे. शिफणकर त्याठिकाणी कोकेनचे पॅकिंग करायचा. त्यानंतर त्या कोकेनची परराज्यांत तस्करी केली जायची, अशी चर्चा आहे. पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडMIDCएमआयडीसी