शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात लम्पी बाधित जनवारांचा आकडा २०० पार, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

By नितीन काळेल | Updated: September 5, 2023 18:56 IST

सातारा : जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचे संकट वाढत असून आता बाधित पशुधनाचा आकडा २०२ झाला आहे. तर आणखी एकाचा मृत्यू ...

सातारा : जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचे संकट वाढत असून आता बाधित पशुधनाचा आकडा २०२ झाला आहे. तर आणखी एकाचा मृत्यू झाल्याने लम्पीने बळी गेलेल्या पशुधनाची संख्या १३ झाली आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस बाधित आणि मृत जनावरांची संख्या वाढत चालल्याने शेतकऱ्यांचीही चिंता वाढलेली आहे.जिल्ह्यात एका वर्षाच्या आत लम्पी चर्मरोगाची दुसरी लाट सुरु झालेली आहे. मागीलवर्षी आॅक्टोबर ते २०२३ मधील मार्चपर्यंतच्या लम्पीच्या पहिल्या लाटेत सुमारे २० हजारांवर जनावरांना चर्मरोगाने गाठले होते. तर १ हजार ४८० जनावरांचा मृत्यू झाला होता. यातून बळीराजा सावरत असतानाच जिल्ह्यात दुसरी लाट सुरू झालेली आहे. मागील १५ दिवसांपासून लम्पी बाधित जनावरे आढळून येत आहेत. फलटणपासून सुरुवात होऊन आता अनेक तालुक्यात बाधित जनावरे झालेली आहेत. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. तर दिवसेंदिवस बाधित जनावरांचा आकडा वाढत चालल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे.बाधित आणि मृत जनावरांची संख्या वाढत असून सोमवारी चर्मरोग झालेल्या पशुधनाचा आकडा १६८ होता. मंगळवारी आणखी ३४ जनावरांना लम्पी झाल्याचे समोर आले. त्यामुळे दुसऱ्या लाटेतील एकूण बाधित पशुधनाचा आकडा २०२ झाला आहे. यामध्ये १२८ गायींना रोगाने गाठलेले आहे. तर बाधित वासरांची संख्या ४० झाली असून ३४ बैलांनाही लम्पीने गाठले आहे. त्याचबरोबर उपचाराने लम्पीमुक्त पशुधनाची संख्या २८ झाली आहे. तर मंगळवारी आणखी एका जनावराचा मृत्यू झाला. त्यामुळे गेल्या काही दिवसांत लम्पीने मृत झालेल्या जनावरांचा आकडा १३ वर पोहोचला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरLumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोग