शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आपले सरकार सेवा केंद्रातील अपहार आकडा ५० लाखांवर ! 

By नितीन काळेल | Updated: September 12, 2022 19:47 IST

प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढणार? 

सातारा : खटाव तालुक्यात  ‘आपले सरकार सेवा केंद्र’ नावाने बनावट बँक बचत खाते काढून ४५ लाखांचा अपहार केल्याने मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी चौकशी समिती नियुक्त केली होती. त्यानंतर आता अन्य तालुक्यांतही अपहाराचा संशय असून एकूण आकडा ५० लाखांवर जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीत ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आहे. सातारा जिल्ह्यातही केंद्रे आहेत. त्यानुसार ग्रामपंचायतींनी केंद्र मोबदल्याची अग्रीम रक्कम जिल्हास्तरावरील खात्यात जमा करण्यासाठी २०१६ मध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र’ मोबदला नावाने बँकेचे सातारा शहरात खाते उघडण्यात आले.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून २०२१-२२ या वर्षासाठी एकूण मागणीपैकी १२२६ ग्रामपंचायतींची अग्रीम मागणी १० कोटी ३१ लाख ८९ हजार ४२२ होती. त्यापैकी ९ कोटी ८७ लाख ४६ हजार ६६४ इतकी रक्कम ग्रामपंचायतींनी जिल्हास्तरावरील बँक खात्यात वर्ग केलेली. परंतु ग्रामपंचायतींनी अग्रीम मागणीपेक्षा ४४ लाख ४२ हजार ७५८ रुपये कमी वर्ग केली. तसेच उर्वरित २६६ ग्रामपंचायतींची मागणी अग्रीम २ कोटी ४६ लाख २६ हजार २२९ रक्कम अद्यापही वर्ग नव्हती. त्यामुळे थकीत रकमेबाबत जिल्हास्तरावर बैठक झाली होती. 

ग्रामपंचायतनिहाय आढावा घेतला त्यावेळी खटाव तालुक्यात गैरव्यवहार झाल्याचे समोर आले. तालुका व्यवस्थापकांनाही विचारणा केली. त्यावेळी त्यांनी रक्कम वर्ग केल्याचे सांगितले होते; मात्र त्यानंतर बँक स्क्रोलनुसार ताळमेळ घातल्यावर रक्कम जुळत नसल्याचे दिसून आले. सखोल माहिती घेतल्यावर खटाव तालुक्यात ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या नावाने बनावट बचत खाते अस्तित्वात असल्याचे निदर्शनास आले. तसेच व्यवहार पाहता तालुका व्यवस्थापकांचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होते. 

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी याबाबत चौकशी समिती तयार केली. या समितीने तपासणी करुन अहवाल द्यायचा होता. आता ही समिती कार्यान्वित होऊन १५ दिवस होऊन गेले. तसेच या समितीलाही काही तालुक्यात किरकोळ का प्रमाणात असेना अपहार झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर आपले सरकार सेवा केंद्रातील घोटाळ्याची व्याप्ती वाढू शकते. तसेच ४५ रुन ५० लाखांवर घोटाळ्याचा आकडा जाण्याची शक्यता आहे. बनावट बँक बचत खाते काढून ‘आपले सरकार सेवा केंद्र’मध्ये सुमारे ४५ लाखांचा अपहार केल्याचे प्रथमदर्शनी खटाव तालुक्यात समोर आले आहे. आता जिल्ह्यात आणखी कोठे गैरव्यवहार झाला आहे का? यासाठी चौकशी समिती नियुक्त केली होती. काही ठिकाणी १० ते १५ हजारांपर्यंतचा अपहार दिसून आला आहे. समितीचा अंतरिम अहवाल दोन दिवसात येईल. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. विनय गौडा,मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Governmentसरकार