शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा तापला; ४० चा टप्पा ओलांडला, वर्षातील उच्चांकी तापमान; उकाड्याने नागरिक घामाघूम

By नितीन काळेल | Updated: May 12, 2023 19:34 IST

सतारा : वारे बंद, ढगाळ वातावरण नाहीसे आणि वातावरण कोरडे झाल्याने सातारा शहराचा पारा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यामुळे ...

सतारा : वारे बंद, ढगाळ वातावरण नाहीसे आणि वातावरण कोरडे झाल्याने सातारा शहराचा पारा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यामुळे शुक्रवारी कमाल तापमाने ४० चाही टप्पा ओलांडला. या वर्षातील हे उच्चांकी तापमान ठरले. तर कडक ऊन आणि उकाड्याने सातारकर घामाघूम होत असल्याने हैराण झाले आहेत.जिल्ह्यात यावर्षी थंडीचे प्रमाण कमी राहिले. मार्चपर्यंत जाणवणारी थंडी फेब्रुवारीतच गायब झाली होती. तर फेब्रुवारीच्या अखेरीसच सातारा शहराचा पारा ३७ अंशापर्यंत पोहोचलेला. त्यामुळे यंदा उन्हाळा सातारकरांना असह्य करणारी अशी स्थिती होती. मागील दोन महिन्याचा विचार करता शहराचा पारा कायम ३० अंशावर आहे. एकदाच कमाल तापमान ३९.९ अंशापर्यंत गेले होते.त्यानंतर वळवाचा पाऊस झाल्याने पारा ३२ अंशापर्यंत खाली आला होता. यामुळे सातारकरांना कडक उन्हाचा अनुभव आला नव्हता. मात्र, चार दिवसांपासून पारा सतत वाढत चालला आहे.सातारा शहरात मागील आठवड्यात पाऊस झाला. त्यावेळी पारा खालावला होता. मात्र, काही दिवसांतच तापमानात मोठी वाढ झाली आहे. सोमवारी तापमान ३३.७ अंश नोंद झाले. मात्र, शुक्रवारी वर्षातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. ४०.४ अंश पारा होता. यामुळे सातारकरांना कडक उन्हाचा सामना करावा लागला. तसेच दुपारच्या सुमारास उकाड्यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. यामुळे अनेक नागरिकांना घराबाहेर पडणे टाळले.दरम्यान, थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरचाही पारा वाढू लागलाय. शुक्रवारी ३३.६ अंशावर तापमान होते. यामुळे महाबळेश्वरचा पाराही ३५ अंशाकडे झुकू लागल्याचे दिसून आले.

सातारा शहरातील कमाल तापमान असे...

दि. १ मे ३४.५, २ मे ३४.५, ३ मे ३५.२, ४ मे ३५.४, ५ मे ३५.३, दि. ६ मे ३६.९, ७ मे ३५.९, ८ मे ३३.७, ९ मे ३५.२, दि. १० मे ३७.८, ११ मे ३९.३ आणि १२ मे ४०.४

पूर्व भागात सूर्य कोपला...साताऱ्याच्या पूर्व भागात माण, खटाव, फलटण तालुक्यात उन्हाची तीव्रता अधिक राहते. त्यामुळे तेथे उन्हाच्या झळा असह्य होतात. सध्या या दुष्काळी भागातील पाऱ्याने ४० अंशाचा टप्पा केव्हाच पार केला आहे. सूर्य कोपत असलातरी बळीराजा आणि मजुरांना काम करावेच लागत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTemperatureतापमान