शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात उन्हाचा कडाका वाढला, पारा पोहचला 'इतक्या' अंशावर

By नितीन काळेल | Updated: February 24, 2023 16:41 IST

यंदाचा उन्हाळा कडक असण्याची शक्यता

सातारा : फेब्रुवारी महिन्यातही थंडीची तीव्रता जाणवते. पण, याच महिन्यात सातारा शहराचा पारा ३६ अंशावर गेला आहे. यामुळे यंदाचा उन्हाळा कडक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.जिल्ह्यात साडे महिने थंडीचे राहिले. ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात थंडीला सुरुवात झाली. त्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातही थंडी होती. पण, कडाक्याच्या थंडीचा अनुभव जिल्हावासीयांना आलाच नाही. सतत किमान तापमान कमी-जास्त होत होते. त्यामुळे कधी पारा २० अंशांपर्यंत जायचा. तर काहीवेळा १३ अंशांपर्यंत खाली येत होता. तापमानातील या चढ-उतारामुळे लोकांना सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास होत होता. एकसमान पारा कधीच राहिला नाही. मात्र, जानेवारी महिना सुरू झाल्यानंतर सातारकरांना कडाक्याच्या थंडीशी सामना करावा लागला.जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच शहराचे किमान तापमान सतत काही दिवस १० ते १२ अंशादरम्यान राहिले. यावेळी एक दिवस पारा १० अंशांपर्यंत खाली घसरला. हे तापमान दोन वर्षांतील नीच्चांकी ठरले. जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात तापमान वाढत गेले. गेल्या काही दिवसांत किमान तापमानात चढ-उतार सुरू झाला आहे. फेब्रुवारी महिन्यात सातारा शहराचे कमाल तापमान ३० ते ३२ अंशांपर्यंत राहते. त्यातच थंडीही जाणवते. ही थंडी मार्च महिना उजाडला तरी असते. यंदा मात्र, उन्हाळ्याला लवकरच सुरुवात झालेली आहे. यामुळे उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत आहेत. तर रात्री उकाड्याशी नागरिकांना सामना करावा लागत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTemperatureतापमान