शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Satara: माउलीच्या जयघोषात रंगले वारीतील पहिले उभे रिंगण!, चांदोबाचा लिंब येथे पार पडला सोहळा

By दीपक शिंदे | Updated: July 8, 2024 19:23 IST

टाळ, मृदंगही बोले विठ्ठल-विठ्ठल; माती कपाळी लावण्यासाठी झुंबड

सातारा :  रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी               देह दंग सावळ्याच्या अंगणीया भक्तिगीताचा प्रत्यय देणारा सोहळा चांदोबाचा लिंब येथे सोमवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. अश्वांच्या नेत्रदीपक दौडीला प्रारंभ झाला. टाळ-मृदुगांच्या गजरात विठ्ठल..विठ्ठल नामाचा उद्घोषात या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण दुपारी चार वाजता पार पडले.संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लोणंद येथील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पालखीतळावर आगमन केल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने नैवेद्य अर्पण करण्यात आला. मध्यान्ह आरती झाली. पुढील प्रवासाला निघण्याचे संकेत देणारा भोंगा वाजताच माउलींच्या जयजयकारात मानकऱ्यांनी पालखी सजविलेल्या रथात ठेवली व सोहळा तरडगावकडे मार्गस्थ झाला. माउलींचा लाखो वैष्णवजनांसह खंडाळा तालुक्यातून फलटण तालुक्यात प्रवेश झाला. कापडगाव येथील सरहद्दीवर फलटण तालुका प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले.पालखी सोहळ्याने फलटण तालुक्यात प्रवेश केल्यानंतर साऱ्या विठ्ठलभक्त वारकऱ्यांना वेध लागले होते. ते उभ्या रिंगणाचे संपूर्ण पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण, रिंगणाच्या उत्सुकतेने वारकऱ्यांची पावले भराभर चांदोबाच्या लिंबकडे पडत होती. रस्त्यांच्या दुतर्फा असणाऱ्या स्थानिक नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात होता. रस्त्याकडील बाजूला असणाऱ्या शेतामध्ये ठिकठिकाणी भारूड व कीर्तन रंगले होते.माउलीचा रथ चांदोबाचा लिंब येथे आला असता, गर्दी असल्याने रिंगण लावताना त्रास होत असला, तरी अखेर पालखी सोहळ्याचे चोपदार यांनी चोप आकाशाकडे धरताच सर्वत्र शांतता पसरली. कोणतीही सूचना न देता वारकऱ्यांच्या गर्दीतून हजारो वारकरी दुतर्फा झाले. अश्व धावत येण्यासाठी जागा ठेवण्यात आली. दुसरीकडे अश्व धावणार असलेल्या मार्गावर रंगावलीच्या स्वयंसेवकांनी रंगीबेरंगी रांगोळी घालून वातावरणात अधिक प्रसन्नता आणली होती. रिंगण लावल्यानंतर रथापुढील २७ दिंड्यांमधून माउलींचा अश्व पुजाऱ्यांनी पळवत आणला.सर्व दिंडीकरांचा टाळ-मृदंगाच्या आवाजात माउलींचा होत असलेला गजर सुरू असतानाच, पळत आलेल्या दोन्ही अश्वांना पाहून वारकरी देहभान विसरून दंग झाले. पाहता-पाहता दोन्ही अश्वांनी माउलींच्या रथाला प्रदक्षिणा घातली व संत ज्ञानेश्वर पादुकांचे दर्शन घेतले. संत ज्ञानेश्वर माउलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन अश्व मागील दिंड्यांपर्यंत नेल्यानंतर माघारी पळत आला.माउलींच्या रथाजवळ अश्व आल्यांनतर सोहळा प्रमुखांनी अश्वास पुष्पहार घालून खारीक-खोबऱ्याचा नैवेद्य दाखविला. त्यानंतर, अश्वाने दौड घेतली. पुढे माउलींचा अश्व व मागे स्वारीचा अश्व अशी दौड पूर्ण झाली. अश्व दौडत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पोहोचताच, चोपदारांनी रथावर उभे राहून हातातील दंड फिरवून रिंगण संपन्न झाल्याचे दर्शविले. यानंतर सोहळा माउलींचा गजर करत पुढे मार्गस्थ झाला.

माती कपाळी लावण्यासाठी झुंबडअश्वास प्रत्यक्ष माउलींचा आशीर्वाद असलेल्या भाविकांनी अश्व ज्या ठिकाणाहून गेला आहे. त्याच्या पायाखालची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली होती. ज्ञानोबा माउली-तुकाराम व पंढरीनाथाच्या जयघोषात सर्व वारकरी तल्लीन झाले होते. अशा तऱ्हेने पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण उत्साहात पार पडले. यानंतर सायंकाळी पाच वाजता पालखी सोहळा तरडगावच्या प्रवेशद्वारावर पोहोचला. ग्रामस्थांनी पालखी रथातून खाली उतरवून माउलीच्या गजरात खांद्यावर घेतली व मेळा वाजत गाजत तालुक्यातील पहिल्या मुक्कामासाठी तरडगावात विसावला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022