शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या शिलेदाराने साकारलेल्या ‘त्या’ किल्ल्यांची ‘युनेस्को’ला भुरळ! 

By सचिन काकडे | Updated: July 14, 2025 14:39 IST

बारा गड-किल्ल्यांच्या प्रतिकृतीचे साताऱ्यातील संग्रहालयात संवर्धन

सचिन काकडेसातारा : महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेले बारा गड-किल्ले आता जागतिक वारसास्थळांमध्ये समाविष्ट झाले आहेत. ‘युनेस्को’च्या ४६व्या अधिवेशनात महाराष्ट्राने दिमाखदारपणे सादर केलेल्या या किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृतींनी ‘युनेस्को’च्या दोन हजार सदस्यांनाही थक्क केले. या किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे शिवधनुष्य पेलले आहे सांगली येथील आंतरराष्ट्रीय मॉडेल मेकर आणि कलाशिक्षक रमेश बलुरगी यांनी. त्यांच्या या कलाकृतींचे सध्या साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात जतन आणि संवर्धन करण्यात येत आहे.

‘युनेस्को’ला सादर केलेली किल्ल्यांची प्रतिकृती..‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत नुकताच महाराष्ट्रातील १२ ऐतिहासिक गड-किल्ल्यांचा समावेश करण्यात आला. यात सातारा जिल्ह्यातील प्रतापगड तसेच रायगड, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, खांदेरी, राजगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे. या सर्व किल्ल्यांच्या प्रतिकृती दिल्लीतील ‘युनेस्को’च्या अधिवेशनात सादर करण्यात आल्या होत्या. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, उपाध्यक्ष ऋषिकेश यादव आणि त्यांच्या चमूने या प्रतिकृती ‘युनेस्को’समोर सादर केल्या. ‘युनेस्को’च्या सदस्यांनी या कलाकृतींचे बारकाईने निरीक्षण केले आणि त्यांचे कौतुक केले.

एकाही किल्ल्यावर न जाता हुबेहूब प्रतिकृती

  • रमेश बलुरगी (हरिपूर) हे सांगलीतील श्रीमती सुंदराबाई दगडे हायस्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी यापैकी एकाही किल्ल्याला प्रत्यक्षात भेट दिली नाही.
  • अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी ड्रोनच्या मदतीने घेतलेले स्कॅनिंग आणि अचूक मोजमाप, तसेच आपली अचाट कल्पनाशक्ती वापरून त्यांनी या प्रतिकृती साकारल्या.
  • या प्रतिकृती इतक्या जिवंत आहेत की, त्या पाहिल्यावर खऱ्या किल्ल्यांची भव्यता आणि बारीकसारीक रचना लक्षात येते.
  • ७ ऑगस्ट २०२४ रोजी या प्रतिकृती दिल्लीहून साताऱ्यातील संग्रहालयात आणण्यात आल्या.

कलाकृती निर्मितीची प्रक्रिया..कागदाचा लगदा, ॲक्रेलिक रंग, फेव्हिकोल, सनबोर्ड आणि लाकडाचा भुसा यांसारख्या साहित्याचा वापर करून हे किल्ले तयार करण्यात आले. रायगड आणि राजगड या किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे वजन सुमारे ३५० किलो असून, इतर किल्ल्यांचे वजन ८० ते १५० किलो आहे. त्यांची सोयीस्कर वाहतूक करता यावी, यासाठी चाके लावलेल्या लोखंडी फ्रेमचा वापर करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील १२ गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्याचं भाग्य मला मिळालं, याचा मनस्वी आनंद आहे. ही संधी दिल्याबद्दल अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचा मी खूप-खूप ऋणी आहे. - रमेश बलुरगी, आर्किटेक्ट मॉडेल मेकर आणि कलाशिक्षक, (हरिपूर) सांगली

महाराष्ट्रातील किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळात समावेश झाला. ही बाब खरोखरच गौरवास्पद आहे. किल्ल्यांचे संवर्धन आता अधिक गतीने करता येईल. युनेस्कोला सादर करण्यात आलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे संग्रहालयात पुरातत्वीय निकषाप्रमाणे संवर्धन केले आले आहे.  - प्रवीण शिंदे, संग्रहालय अभिरक्षक