शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

जनता बँकेसाठी छाननीत पाच अपात्र; उपनिबंधकांनीही अपिल फेटाळले, २ जूनलाच चित्र स्पष्ट होणार

By नितीन काळेल | Updated: May 30, 2023 19:11 IST

निवडणूक रिंगणात अजूनही ३७ जण

सातारा : सातारा शहरवासीयांची अर्थवाहिनी असणाऱ्या जनता सहकारी बँक निवडणुकीत अपात्र केलेल्या पाचजणांचे अपिल जिल्हा उपनिबंधकांनीही फेटाळले. त्यामुळे त्यांच्यासमोर न्यायालयाचा पर्याय राहिला आहे. तर आतापर्यंत कोणीही उमेदवारी माघारी घेतलेली नाही. त्यामुळे निवडणूक रिंगणात अजूनही ३७ जण आहेत. तर २ जून माघारची शेवटची तारीख असल्याने त्याचदिवशी सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.जनता सहकारी बँकेचीनिवडणूक जाहीर झालेली आहे. या निवडणुकीत सर्वसाधारणमधून १६ जणांना निवडून द्यायचे आहे. महिला प्रवर्ग २, अनुसूचित जाती-जमाती गटातून १, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास गट १ आणि ओबीसी गटातूनही एका संचालकाला निवडून द्यायचे आहे. यासाठी सत्ताधारी भागधारक पॅनेलने पूर्ण पॅनेल निवडणुकीत उतरविले आहे. निवडणुकीत प्राप्त अर्जांची छाननी झाल्यानंतर पात्र ३७ जणांच्या नावांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.सर्वसाधारणधून निवडणूक रिंगणात २५ उमेदवार राहिले आहेत. यामध्ये अरुणकुमार यादव, निशांत पाटील, रामचंद्र साठे, वजीर नदाफ, अतुल जाधव, विनोद कुलकर्णी, जयवंत भोसले, जयेंद्र चव्हाण, आनंदराव कणसे, माधव सारडा, अमोल मोहिते, वसंत लेवे, नारायण लोहार, चंद्रशेखर घोडके, अविनाश बाचल, प्रकाश बडेकर, चंद्रकांत बेबले, मच्छिंद्र जगदाळे, शकील बागवान, नरेंद्र पाटील, सुवर्णादेवी पाटील, अक्षय गवळी, अशोक मोने, महेश राजेमहाडिक आणि रवींद्र माने यांचा समावेश आहे.तर विमुक्त जातीमधून बाळासाहेब गोसावी यांचा एकमेव अर्ज राहिल्याने ते बिनविरोध निवडून आल्यातच जमा आहेत. तर इतर मागास प्रवर्गातून अशाेक मोने, श्रीकांत आंबेकर, चारुदत्त सपकाळ, शकील बागवान, वजीर नदाफ, चंद्रशेखर घोडके हे पात्र ठरले आहेत. अनुसूचित जाती-जमाती राखीवमधून विजय बडेकर आणि प्रकाश बडेकर आहेत. महिला राखीवमधून सुजाता राजेमहाडिक, चेतना माजगावकर, सुवर्णादेवी पाटील हे पात्र ठरले आहेत. मागील आठ दिवसांपासून अर्ज माघारची प्रक्रिया सुरु झालेली आहे.

या ५ जणांचे फेटाळले अपिल...बॅंकेचा संचालक होण्यासाठी असणारा पात्रता निकष पूर्ण करण्यास पात्र नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अनुराधा पंडितराव यांनी अर्ज छाननी दरम्यान, ६ जणांना अपात्र केलेले. त्यामधील पाचजणांनी जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांच्याकडे अपिल केले होते. यावर सुनावणी झाल्यानंतर माळी यांनी पाचही जणांचे अपिल फेटाळले. सुरज अरुण यादव, संजयकुमार शंकरराव पवार, संजय दत्तात्रय सूर्यवंशी, सलीम राजमहमद बागवान आणि राजीव उत्तम शिर्के अशी संबंधितांची नावे आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbankबँकElectionनिवडणूक