शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Satara: यवतेश्वर घाट मार्गे प्रवास करताय? त्याआधी वाचा महत्वाची बातमी

By दीपक शिंदे | Updated: July 22, 2023 12:29 IST

यवतेश्वर घाटातील धोकादायक दरड, महसूल, बांधकाम विभागाकडून पाहणी

सातारा : जिल्ह्यातील २२ गावांतील ३६९ ग्रामस्थांना भूस्खलन, दरड कोसळणे आदी धोकादायक कारणांमुळे तात्पुरत्या निवारा शेडमध्ये हलवण्यात आले आहे. तसेच जिल्हा प्रशासन, महसूल, बांधकाम विभागाकडून दुर्गम भागातील धोकादायक ठिकाणांची पाहणी झाली असून, यवतेश्वर घाटातील धोकादायक दरड सोमवारी सकाळी ९ वाजता पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून या रस्त्यावरील वाहतूक रविवारी रात्री १२ पासून ते सोमवारी रात्री बारापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.इर्शाळवाडीतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. प्रत्येक तालुक्यात आपतकालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी जेसीबी, पोकलॅन, वूड कटर यंत्रणा सुसज्ज ठेवली आहे. दरम्यान, पाटण तालुक्यातील चाळकेवडी चिखली रस्त्यावर कोसळलेली दरड तातडीने काढण्यात आली. तसेच यवतेश्वर घाटात धोकादायक सुळका पाडण्याच्या अनुषंगाने प्रांताधिकारी सुधाकर भाेसले तसेच बांधकाम विभागाचे प्रशांत खेरमोडे यांनी पाहणी केली होती. यानंतर शनिवारी-रविवारी रहदारी जास्त असल्याने सोमवारी हा धोकादायक सुळका पाडण्यात येणार आहे. हा सुळका घाट रस्त्यावर आदळून पायथ्यानजिकच्या शेतापर्यंत जाऊ शकतो. त्यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून या रस्त्यावरील वाहतूक रविवारी रात्री १२ पासून ते सोमवारी रात्री बारापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. धोकादायक ठिकाणांहून तात्पुरत्या निवारा शेडमध्ये हलवलेल्या नागरिकांना पुरेसे धान्य देण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास आणखी भूखंड आरक्षित करून त्याठिकाणी निवारा शेड बनवून वीजपुरवठा, पिण्याचे पाणी, अन्नधान्याचा साठा उपलब्ध करण्यात येणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlandslidesभूस्खलनTrafficवाहतूक कोंडी