शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Satara: नगराध्यक्षांच्या कक्षाला टाळे ठोकणे भोवले; ‘प्रहार’च्या चौघांना शिक्षा; कऱ्हाड न्यायालयाचा निकाल 

By संजय पाटील | Updated: June 25, 2024 18:09 IST

शिपायाला ठेवले होते कोंडून; सरकारी कामात अडथळा

कऱ्हाड : येथील पालिकेत नगराध्यक्षांच्या कक्षाला बाहेरून कुलूप लावून पालिकेच्या शिपायाला कोंडून ठेवल्याप्रकरणी प्रहार संघटनेच्या चार कार्यकर्त्यांना न्यायालयाने कोर्ट उठेपर्यंत साधी कैद आणि प्रत्येकी ५ हजार २०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्या. अण्णासाहेब पाटील यांनी मंगळवारी ही शिक्षा सुनावली.सतीश विष्णू पाटील, सुहास शामराव पाटील, महेशकुमार शिवाजी शिंदे व नीतीराज रामचंद्र जाधव (सर्वजण रा. कऱ्हाड ) अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत. सरकार पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, २५ फेब्रुवारी २०२० रोजी प्रहार संघटनेचे सतीश पाटील, सुहास पाटील, महेशकुमार शिंदे व नीतीराज जाधव यांनी नगराध्यक्षांच्या कक्षाच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावले. यावेळी पालिकेचे शिपाई यशवंत महादेव साळुंखे हे कक्षामध्ये अडकले. कार्यकर्त्यांनी त्यांना कोंडून ठेवत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी कºहाड शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड. एम. व्ही. कुलकर्णी यांनी काम पाहिले. त्यांनी सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासले. त्यामधील फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक ए. पी. बाबर यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सरकार पक्षाने केलेला युक्तिवाद, साक्षीदारांच्या साक्ष आणि सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने चारही आरोपींना कोर्ट उठेपर्यंत साधी कैद, प्रत्येकी ५ हजार २०० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन आठवडे साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडCourtन्यायालय