शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

फ्लेक्स, होर्डिंग उतरले अन् साताऱ्याचे रूप बदलले!, नागरिकांमध्ये समाधान

By सचिन काकडे | Updated: June 1, 2024 12:42 IST

पालिकेची कारवाई जोरात : आठ दिवसांत पंधरा होर्डिंग्ज जप्त; नागरिकांमध्ये समाधान

सातारा : सातारा शहराला लागलेले अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंगचे ग्रहण आता सुटू लागले असून, हे शहर कित्येक वर्षांनंतर मोकळा श्वास घेऊ लागले आहे. शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांचे बदललेले हे रूप पाहून सातारकरांमधूनही पालिकेचे कौतुक होत आहे.सातारा शहर स्वच्छ व सुंदर आहेच; परंतु या शहरात पाऊल ठेवले की मोठ-मोठे फ्लेक्स अन् होर्डिंग नजरेस पडायचे. पालिकेकडून नो फ्लेक्स झोन जाहीर करूनही त्याचा फ्लेक्स व होर्डिंगधारकांवर फारसा प्रभाव झाला नव्हता. पालिकेच्या कारवाईला न जुमानता शहरातील प्रमुख चौक, रस्ते तसेच इमारतींवर फ्लेक्स व होर्डिंग उभारले जात होते. अलीकडच्या दीड-दोन वर्षांत वर्षांत हे प्रमाण इतके वाढले की संपूर्ण शहर फ्लेक्स व होर्डिंगच्या आड गुडूप होऊन गेले.मात्र, घाटकोपर दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीनंतर संपूर्ण राज्यातील होर्डिंग व फ्लेक्सचा विषय चर्चेचा ठरला. सातारा जिल्हा प्रशासनानेदेखील होर्डिंगचा विषय गांभीर्याने घेत अनधिकृत होर्डिंग हटविण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले. सातारा पालिका प्रशासनाने आठ दिवसांपासून कारवाईस प्रारंभ केला असून, आतापर्यंत पंधराहून अधिक अनधिकृत होर्डिंग व शेकडो फ्लेक्स मुळासकट काढून टाकले आहेत. फ्लेक्स व होर्डिंगची गर्दी कमी होऊ लागल्याने या शहराचे रूपही आता हळूहळू बदलू लागले आहे.

खांद्यावरील ओझे हलकेसातारा शहरातील इमारती व सार्वजनिक रस्ते गेल्या अनेक वर्षांपासून फ्लेक्स व होर्डिंगचा भार सहन करत आले आहेत. खांद्यावरील हे ओझे उतरू लागल्याने इमारती, रस्ते व दुकानांनाही आता हलके-हलके वाटू लागले आहे. हा बदल पाहून परगावातून साताऱ्यात येणाऱ्या शेतकरी व नोकदरांनाही सुखद धक्का बसत आहे.

पालिकेने सातत्य ठेवावे..घाटकोपर येथील घटना दुर्दैवीच आहे. मात्र, या घटनेनंतर प्रशासनाने कारवाईचे ठोस पाऊल उचलल्याने त्याचे चांगले परिणामही दिसू लागले आहेत. सातारा शहराला राजधानीचा मान मिळाला आहे. त्यामुळे या शहराचे विद्रुपीकरण होईल असे कृत्य कोणीही करू नये. पालिका प्रशासनाने सुरू केलेली ही कारवाई योग्यच असून, यात सातत्य ठेवायला हवे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

असे हटविले होर्डिंग

  • कूपर कॉलनी - ०६
  • गोडोली - ०२
  • राजवाडा बसस्थानक - ०३
  • नगरवाचनालय - ०३
  • मोती चौक - ०१
टॅग्स :Satara areaसातारा परिसर