शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलन समाजाचे मन समृद्ध करते - शरणकुमार लिंबाळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 19:32 IST

हे संमेलन संपूर्ण जिल्ह्याची अस्मिता : शिवेंद्रसिंहराजे

सातारा : ‘साहित्य संमेलन म्हणजे केवळ लेखकांचा उत्सव नसून तो समाजाचा आरसा आहे. १८७८ साली न्यायमूर्ती, रानडे यांनी समाजप्रबोधनाच्या हेतूने लावलेले हे रोपटे आता शंभराव्या संमेलनाकडे दिमाखात वाटचाल करत आहे. पुस्तकांमध्ये माणसाचे मन आणि पर्यायाने जग बदलण्याची ताकद असते. साताऱ्यातील साहित्य संमेलन लोकांचे, देशाचे आणि समाजाचे मन समृद्ध करण्यासाठी नक्कीच प्रेरक ठरेल,’ असा विश्वास ‘सरस्वती सन्मान’प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांनी व्यक्त केला.साताऱ्यात दि. १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ मंगळवारी (दि. १६) सकाळी शरणकुमार लिंबाळे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पार पडला. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी संतोष पाटील, महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाहक सुनीताराजे पवार, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, जनता बँकेचे अध्यक्ष अमोल मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.लिंबाळे पुढे म्हणाले, ‘साहित्य संमेलनाच्या निमित्ताने लेखकाला वाचक, प्रकाशक आणि रसिक अशा तिन्ही घटकांशी संवाद साधता येतो. हे संमेलन साहित्यिकांसाठी आत्मभान देणारे ठरेल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद कुलकर्णी यांनी केले, तर सुनीताराजे पवार व नंदकुमार सावंत यांनी संमेलन यशस्वी करण्याची ग्वाही दिली.

हे संमेलन संपूर्ण जिल्ह्याची अस्मिता : शिवेंद्रसिंहराजे‘९९ व्या संमेलनासाठी कोल्हापूर, इचलकरंजी आणि औदुंबर यांसारख्या शहरांची नावे शर्यतीत होती. मात्र, ‘मसाप’च्या सातारा शाखेने घेतलेल्या परिश्रमांमुळे हा बहुमान सातारा नगरीला मिळाला आहे. हे संमेलन केवळ शहरापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण जिल्ह्याचे आहे. साहित्याच्या या महाकुंभात प्रत्येक जिल्हावासीयाने सहभागी व्हावे,’ असे आवाहन मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.‘कृष्णकाठचा थाट’ दिसेल : प्रा. मिलिंद जोशी९८ वे संमेलन देशाच्या राजधानीत झाले होते, तर ९९ वे संमेलन छत्रपतींच्या ऐतिहासिक राजधानीत होत आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी मातीत होणारे हे पहिलेच अखिल भारतीय संमेलन आहे. संमेलने केवळ आर्थिक बळावर नाही, तर समाजाच्या योगदानावर यशस्वी होतात. सातारा जिल्ह्याने या संमेलनातून कृष्णकाठचा थाट काय असतो, हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून द्यावे, असे आवाहन साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Literature enriches society's mind: Sharan Kumar Limbale at Sahitya Sammelan.

Web Summary : Sahitya Sammelan, more than a festival, mirrors society. Sharan Kumar Limbale inaugurated the 99th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan in Satara, emphasizing literature's power to transform minds. Shivendrasinhraje Bhosale highlighted the event's significance for the entire district, inviting participation. Milind Joshi urged showcasing Satara's unique cultural essence.