शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील उद्योजकाच्या मुलाचा मृतदेह नीरा नदीत आढळला

By दत्ता यादव | Updated: November 7, 2022 06:08 IST

सांगली येथील प्रसिद्ध उद्योजक सुमेध शहा यांचा मुलगा साैमित शहा (वय २३) याचा शिरवळजवळील निरा नदीच्या पात्रात रविवारी सकाळी साडेआठ वाजता मृतदेह आढळून आला.

सातारा :

सांगली येथील प्रसिद्ध उद्योजक सुमेध शहा यांचा मुलगा साैमित शहा (वय २३) याचा शिरवळजवळील निरा नदीच्या पात्रात रविवारी सकाळी साडेआठ वाजता मृतदेह आढळून आला. ही आत्महत्या आहे की घातपात, याबाबत शिरवळ पोलीस तपास करत असून, या घटनेची शिरवळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साैमित शहा (रा. पटेल चाैक, हायस्कूल रोड, सांगली) हा शनिवारी दुपारी चार मित्रांसोबत कारने पुण्याला गेला. रात्री साडेनऊ वाजता पुण्यातील एका हाॅटेलमध्ये सर्व मित्र जेवण करण्यासाठी थांबले होते. त्यावेळी साैमितने मित्रांना पाच मिनिटांत येतो, असे सांगून तो कार घेऊन निघून गेला. तो बराच वेळ झाला आला नाही. त्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याच्या सांगलीतील घरी या प्रकाराची माहिती दिली.दरम्यान, नातेवाईकांनी रात्री उशिरा सौमितचा शोध सुरु केला. मात्र, तो सापडला नाही. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी निरा नदीच्या पात्रात साैमितचा मृतदेह आढळून आला. यामुळे शहा कुटुंबीयांना याचा जबर मानसिक धक्का बसला. घटनास्थळी शहा कुटुंबीय तत्काळ पोहोचले. सांगली शहरात सुनील फ्लेक्स प्रिटिंग असा त्यांचा व्यवसाय आहे. साैमितच्या मृत्यूमुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली आहे.

त्याचा शेवटचा ‘हेल्प’ असा मेसेजपुण्यात सोडलेल्या मित्रांनी रात्री उशिरा सौमितला फोन केला. त्यावेळी त्याचा आवाज घाबरलेल्या स्थितीत होता. त्यानंतर तर त्याने ‘हेल्प’असा मेसेज त्यांच्या मित्रांना पाठवल्याचे समजते. याबाबत सौमितच्या नातेवाईकांनी दुजोराही दिला आहे. त्यामुळे सौमित शहा याचा बुडून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले असले तरी तो कसा बुडाला, नदीत पडला कसा, याचे मात्र, गूढच आहे. त्याचा हेल्प हा अखेरचा मेसेज ठरला.

गाडी सापडली फार्महाऊजवळसाैमितची गाडी निरा नदीच्या काठाला असलेल्या एका फार्महाऊसजवळ सापडली आहे. सध्या त्याची गाडी शिरवळ पोलिसांकडे आहे. या गाडीमध्ये काही कागदपत्रेही आहेत. सोमवारी सकाळी फाॅरेन्सिक तज़्ज्ञ आणि डाॅग स्काॅडही पाचारण करण्यात येणार आहे. त्यानंतरच या प्रकरणातील आणखी वस्तुस्थिती समोर येणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर