शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात पाऊस, फुलांच्या वर्षावात बाप्पा विराजमान!, पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका

By सचिन काकडे | Updated: September 19, 2023 13:46 IST

'मोह नको.. अहंकार नको..नको कपडे छान, दरवर्षी भरभरून पिकू दे माझ्या शेतकऱ्याचं रान' असे साकडेही बाप्पांना घातले

सातारा : वरुणराजाने केलेला जलाभिषेक, फुलांचा वर्षाव, पारंपरिक वाद्यांचा गजर अन् 'बाप्पा मोरया'चा जयघोष, अशा मंगलमय वातावरणात सातारा शहरात मंगळवारी विघ्नहर्त्याची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. गणरायाच्या चरणी लीन होतानाच भक्तांनी 'मोह नको.. अहंकार नको..नको कपडे छान, दरवर्षी भरभरून पिकू दे माझ्या शेतकऱ्याचं रान' असे साकडेही बाप्पांना घातले.गणेश आगमनाची चाहूल लागल्यापासून बाजारपेठ विविधरंगी वस्तूंनी सजून गेली होती. भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. जो-तो लाडक्या बाप्पांची आतुरतेने वाट पाहत होता. ही आतुरता मंगळवारी संपली अन् सार्वजनिक मंडळांसह घरोघरी बाप्पा विराजमान झाले. सातारा शहरात मंगळवारी सकाळपासूनच वाजत-गाजत बाप्पांचे स्वागत करण्यात आले. शहरातील कुंभारवाड्यातून गणेशमूर्ती घरी घेऊन जाण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. कोणी दुचाकीवरून तर कोणी रिक्षात, कोणी चारचाकीत तर कोणी पायी चालत लाडक्या बाप्पाची भक्तिभावाने प्रतिष्ठापना केली.शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांकडून ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या मिरवणुका लक्षवेधी ठरल्या. हा मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी राजपथावर नागरिकांची गर्दी लोटली होती. गणपती बाप्पांच्या प्रतिष्ठापनेला वरुणराजाने हजेरी लावली. तरीदेखील भक्तांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर