शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांचा बंद संपला, सातारा जिल्ह्यातील १४०० ग्रामपंचायतींचा कारभार उद्यापासून सुरू होणार 

By नितीन काळेल | Updated: December 20, 2023 17:35 IST

सातारा : सरंपच, उपसरंपचांच्या मानधनात वाढ करावी, संगणक चालकांना शासनपातळीवर नियुक्ती द्यावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील सुमारे १४०० ग्रामपंचायतींना ...

सातारा : सरंपच, उपसरंपचांच्या मानधनात वाढ करावी, संगणक चालकांना शासनपातळीवर नियुक्ती द्यावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील सुमारे १४०० ग्रामपंचायतींना टाळा होता. यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प झालेला. बुधवारी तीन दिवसांचा बंद संपला असून गुरुवारपासून गावगाडा पुन्हा  सुरू होणार आहे. यामुळे रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत. तर यामध्ये सरपंच, उपसरपंचांसह संगणक चालक, ग्रामरोजगार सेवक सहभागी झाले होते.याबाबत सरपंच परिषद पुणे महाराष्ट्रच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना ग्रामपंचायतीच्या विविध अडचणी, मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यामध्ये सरपंच मानधन १० हजार तर उपसरपंचांचे ३ हजार रुपये करावे, अशी मागणी केली होती. तसेच १५ वा वित्त आयोग निधी २०११ च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार न देता सध्याच्या लोकसंख्येवर वितरित करण्यात यावा, संगणक आॅपरेटरची नियुक्ती शासनपातळीवर करावी किंवा त्यांचे अधिकार ग्रामपंचायतीला द्यावेत. कर्जमाफी योजनेतील ५० हजार रुपये त्वरित जमा करावेत यासह आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या होत्या. यासाठी तीन दिवसांचा बंद पुकारला.सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीही या आंदोलनात सहभागी होत्या. जिल्ह्यात १४९२ ग्रामपंचायती आहेत. त्यामधील सुमारे १४०० ग्रामपंचायती सहभागी झाल्याचा अंदाज आहे. यामुळे सर्व गावगाडा ठप्प झाला. ग्रामपंचायती बंद असल्याने लोकांना वेळेत दाखलेही मिळाले नाहीत. त्यामुळे हेलपाटे मारण्याची वेळ आली. आता तीन दिवसांचा बंद संपला असून गुरुवारपासून ग्रामपंचायतींचा कारभार पुन्हा सुरू होणार आहे.

ग्रामसेवकही बंदमध्ये सहभागी..महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (डीएनई १३६) या बंदमध्ये सहभागी होती. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्र करुन पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करणे, अतिरिक्त काम कमी करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीच्या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी करावी. विस्तार अधिकारीपदाची संख्या वाढविणे, कंत्राटी ग्रामसेवक भरती बंद करणे, ग्रामसेवकांचे प्रश्न विधान परिषदेत मांडण्यासाठी प्रतिनिधीत्व मिळावे आदी मागण्यांसाठी ग्रामसेवक बंदमध्ये सहभागी होते.

राज्य शासनाकडे आम्ही विविध मागण्या केल्या होत्या. यासाठी जिल्ह्यातील १४०० हून अधिक ग्रामपंचायती तीन दिवस बंद ठेवण्यात आलेल्या. त्यामुळे कोणतेही काम झाले नाही. शासनही मागण्यांबाबत सकारात्मक आहे. त्यामुळे गुरुवारपासून ग्रामपंचायतींचा कारभार पुन्हा सुरू होत आहे. तरीही शासनाने मागण्यांबाबत निर्णय न घेतल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरवू. - जितेंद्र भोसले, प्रदेशाध्यक्ष सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायतStrikeसंप