शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Satara: मुनावळे जलपर्यटनस्थळी बोटीतून १०० टक्के मतदानाचा संदेश

By नितीन काळेल | Updated: April 24, 2024 19:29 IST

प्रशासनाचा अभिनव उपक्रम : मतदारांना आकर्षित करण्यासाठी उचलले पाऊल 

सातारा : लोकसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. अशाचप्रकारे जावळी तालुक्यातील मुनावळे या जलपर्यटनस्थळीही प्रशासनाने बोटींचा वापर करुन निवडणुकीची ७ मे ही तारीख आणि १०० टक्के मतदान करणारच अशा संदेशाचा अभिनव उपक्रम राबवून पर्यटक तसेच नागरिकांत जागृती करण्याचे महत्वपूर्ण काम केले.सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने स्वीप कार्यक्रमांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’च्या नोडल अधिकारी याशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून मुनावळे येथे एमटीडीसी पर्यटन केंद्राच्या सहाय्याने लोकांना मतदानाकडे आकर्षित करण्यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात आला.कोयना धरणाच्या जलाशयात हा उपक्रम राबविला. यासाठी बोटींचा सहभाग घेण्यात आला. त्यावर मतदानाची तारीख आणि १०० टक्के मतदान करणार असा मजकूर होता. यामुळे स्थानिक नागरिक तसेच पर्यटनासाठी आलेल्या लोकांमध्येही मतदानाचे महत्व पटविण्यात या उपक्रमाचा हातभार लागला. तर यापूर्वी प्रशासनाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मानवी साखळी उपक्रमाचे आयोजन केले होते.मुनावळे येथील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, जावळीचे गटविकास अधिकारी मनोज भोसले, ग्रामसेवक आदींनी प्रयत्न केले. सातारा स्वीप कक्षामधील किरण कांबळे, राजेंद्र भोसले यांनी कार्यक्रमाचे नियोजन करून पर्यटकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्याचे काम केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरVotingमतदानtourismपर्यटन