शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील फूटपाथवर टपऱ्यांचा थाट ! यंत्रणेचे दुर्लक्ष : पालिका, बांधकाम विभागाच्या झोपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 16:02 IST

सातारा शहरातून जाणाऱ्या महाबळेश्वर-रहिमतपूर रस्त्याचे चौपदरीकरण टपरीबहाद्दरांच्या पथ्यावर पडले आहे. फूटपाथवरच टपऱ्या मांडल्याने गंभीर प्रश्न पुन्हा एकदा आ वासून उभा राहिला आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यातील फूटपाथवर टपऱ्यांचा थाट ! यंत्रणेचे दुर्लक्ष पालिका, बांधकाम विभागाच्या झोपा

सातारा : सातारा शहरातून जाणाऱ्या महाबळेश्वर-रहिमतपूर रस्त्याचे चौपदरीकरण टपरीबहाद्दरांच्या पथ्यावर पडले आहे. फूटपाथवरच टपऱ्या मांडल्याने गंभीर प्रश्न पुन्हा एकदा आ वासून उभा राहिला आहे.पालिका व बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांच्या सोयीच्या कारभारामुळे टपरीबहाद्दरांना रान मोकळे पडले आहे. या रस्त्याचे मोठ्या थाटात चौपदीकरण करण्यात आले. बसस्थानक परिसरात रस्त्याच्या कडेला असणारे अतिक्रमणहटविण्यात आले. एवढेच काय पण बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर असणारे महाकाय वडाचे झाडही तोडून टाकण्यात आले. या रस्त्याच्या दुतर्फा फूटपाथ तयार करण्यात आले. मात्र, या फूटपाथवर पुन्हा अतिक्रमणे बोकाळू लागली आहेत.जिल्हा परिषद सभापती निवासाच्या बाहेरच्या फूटपाथवरच आता खोकी थाटलेली पाहायला मिळत आहेत. या रस्त्यावर वाहनांचा वेग मोठा असतो. पादचाऱ्यांना फूटपाथवरुन चालण्याशिवाय पर्याय नाही. आता या खोक्यांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरुन चालण्याशिवाय पर्याय उरललेला नाही. तहसीलदार व प्रांताधिकारी कार्यालय याचा परिसरात असल्याने येथे मोठी गर्दीही असते.पादचाऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. मात्र पालिका किंवा बांधकाम विभागाची यंत्रणा मात्र कारवाई का करत नाही, यात नेमके काय काळे बेरे आहे? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. फूटपाथवर मांडलेली खोकी कुणाच्या आशीर्वादाने आली? तसेच याला पालिका व बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची फूस आहे का? यातून निर्माण होणारा काळाबाजार जनतेसमोर येण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच कारवाई करण्याची अपेक्षा सातारकर व्यक्त करत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad safetyरस्ते सुरक्षा