शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या इच्छाशक्तीमुळेच मराठ्यांना आरक्षण, उदयनराजेंची फडणवीसांवर स्तुतिसुमने

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 14:02 IST

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत.

सातारा- राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत. मराठा आरक्षणाचा धाडसी निर्णय सध्याच्या शासनानं घेतलेला आहे, असं उदयनराजे म्हणाले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न मागेच मार्गी लागायला हवा होता. मागील सरकारच्या काळात ते का झाले नाही, हे माहीत नाही.मात्र भाजप सरकारची इच्छाशक्ती असल्याने हे आरक्षण मिळाले, असंही ते म्हणाले आहेत. सरकारला लोकांकडून पोचपावती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. बोलण्यापेक्षा करणं महत्त्वाचं असतं, बोलणारे भरपूर असतात, पण करणारे मोजकेच असतात. शेवटी समाजाचं जे लोक हित जोपासतात, अशाच नेत्यांच्या लोक पाठीशी उभे राहतात, असंही ते म्हणाले आहेत. साताऱ्यातील रखडलेल्या कामांबाबतही उदयनराजे यांनी मुद्दे उपस्थित केले. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे काम करण्यासाठी आ. शिवेंद्रराजे यांनीही पाठपुरावा केल्याचे उदयनराजे यांनी सांगितल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. शेंद्रे कागल रस्त्याचे कामही सुरू करावे, सुरुर महाबळेश्वर पोलादपूर रस्ता रूंदीकरण करावे, बोंडारवाडीचे धरण होणे गरजेचे आहे, कास धरणाच्या कामासाठी ५० कोटी द्यावे, मेडिकल कॉलेजचा प्रश्न मार्गी लावावा, संग्रहालयाला ५ कोटी द्यावेत हे काम पुरातत्त्व विभागाकडून बांधकाम विभागाकडे द्यावे, अशा मागण्याही खासदार उदयनराजे भोसले यांनी फडणवीस सरकारकडे केल्या आहेत. 

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसले