शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

खंडाळा इथं कारचा भीषण अपघात; महिलेसह १० वर्षाचा मुलगा जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2023 11:22 IST

भरधाव वेगाने आली असता कारने महामार्गालगत अवैधरित्या थांबलेल्या मालट्रकला जोरदार धडक दिली

मुराद पटेल

शिरवळ - पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा गावच्या हद्दीमध्ये बाळूमामाच्या मेंंढरांचे दर्शन घेऊन परतणा-या भाविकांच्या कारने महामार्गालगत अवैधरित्या थांबलेल्या मालट्रकला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत महिलेसह दहा वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहे.यावेळी अपघातस्थळी मोठी विचिञ परिस्थिती निर्माण झाली होती.दरम्यान,एक मार्च रोजी राञी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

याबाबतची घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की,पुणे जिल्ह्यातील वडगाव रासाई ता.शिरुर येथील वनशिवे,कुलते कुंटूंबिय नातेवाईकांसमवेत सातारा जिल्ह्यामध्ये असणाऱ्या बाळूमामाच्या दर्शनासाठी कार (क्रं.एमएच-13-एन-3154) मधून गेले होते.यावेळी दर्शन घेऊन परत घरी पुणे बाजूकडे परतत असताना कार खंडाळा येथील एका हॉटेलसमोर भरधाव वेगाने आली असता कारने महामार्गालगत अवैधरित्या थांबलेल्या मालट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक ऐवढी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. 

कारमध्ये बसलेल्या कांचन चंद्रकांत वनशिवे(वय30,वडगाव रासाई ता.शिरुर जि.पुणे),विरेंद्र चंद्रकांत वनशिवे(वय 10) हे दोघे जागीच ठार झाले तर कारमधील संकेत भिमाजी चौधरी (वय 22,रा.वडगाव रासाई ता.शिरुर जि.पुणे),स्नेहल पांडुरंग कुलते(वय 42,रा.अकोला),अनिल मुक्ताराम कुलते(वय 55,रा.अकोला),अंजली अनिल कुलते(वय 50,रा.अकोला),परी अनिल कुलते(वय 7) हे पाच जण गंभीर जखमी झाले आहे.दरम्यान,घटनेची माहिती मिळताच तत्काळ खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसहित घटनास्थळी धाव घेतली.यावेळी कारचा चक्काचूर झाल्याने जागीच ठार झालेल्या कांचन वनशिवे व विरेंद्र वनशिवे यांचे मृतदेह काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत क्रेनच्या साहाय्याने कारचा भाग बाजूला करत घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या मदतीने मृतदेह काढण्यात खंडाळा पोलीसांना यश आले.

यावेळी गंभीर जखमी झालेल्या भाविकांना खंडाळा येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरु आहे.या घटनेची नोंद करण्याचे काम खंडाळा पोलीस स्टेशनला सुरु होते.

टॅग्स :Puneपुणे