विटा : चालकाचा ताबा सुटल्याने वळण रस्त्यावर टेम्पो उलटल्याने झालेल्या अपघातात बावीसजण जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास हिंगणगादे गावाजवळ घडली. टेम्पोमधील सर्वजण कडेपूर (ता. कडेगाव) येथील असून ते नागेवाडी (ता. खानापूर) येथे नातेवाईकाच्या रक्षा विसर्जनासाठी निघाले होते.कडेपूर येथील सुमारे २२ ते २५ जण टेम्पोतून (क्र. एमएच. १०-ए.-५०७६) नागेवाडीला नातेवाईकाच्या रक्षा विसर्जनासाठी निघाले होते. त्यांचा टेम्पो नेवरीहून हिंंगणगादे रस्त्याने नागेवाडीला येत असताना, हिंगणगादे गावाजवळ असलेल्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो रस्त्याकडेला नाल्यात उलटला.या अपघातात वंदना निकम (वय ३५), गोकुळा यादव (६२), इंदुबाई चव्हाण (६०), बाळासाहेब यादव (६५), हिराबाई निकम (७०), सुरेखा यादव (४५), पार्वती यादव (६५), आनंदीबाई यादव (६५), सुभद्रा मोहिते (६६), निर्मला चव्हाण (३७), दिलीप यादव (५०), नंदा दशरथ यादव (३२), पुष्पा यादव (३०), अर्चना यादव (३५), तारुबाई चव्हाण (६०), रंजना यादव (३५), ताई यादव (५०), लीलावती चव्हाण (५०), बेबी यादव (५५), ज्ञानेश्वर सुतार (७५), कुसूम यादव (४८, सर्व रा. कडेपूर) व स्वाती निवास दगडे (३५, रा. शिवणी) असे २२ जण जखमी झाले आहेत.अपघातानंतर जखमींना तातडीने विटा ग्रामीण रुग्णालय व इतर खासगी रुग्णालयात दाखल केले. जखमीतील सातजणांना कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल केले. अपघाताची नोंद विटा पोलिसांत झाली असून, अधिक तपास हवालदार एम. एस. महाडिक करीत आहेत. (वार्ताहर)विटा ग्रामीणकडून तातडीने मदतहिंगणगावनजीक टेम्पो उलटल्याची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ मदतीसाठी धावले. सर्व जखमींना तातडीने विटा ग्रामीण रुग्णालय व इतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमीतील सातजणांना कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची नोंद विटा पोलिसांत झाली आहे.
टेम्पो उलटून कडेपूरचे २२ जखमी
By admin | Updated: April 22, 2015 00:27 IST