शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

महाशिवरात्रीला क्षेत्र महाबळेश्वरमधील ‘देऊळ बंद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:36 IST

महाबळेश्वर : महाशिवरात्रीला दरवर्षी क्षेत्र महाबळेश्वर येथे यात्रा भरते; परंतु मागील वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. श्री ...

महाबळेश्वर : महाशिवरात्रीला दरवर्षी क्षेत्र महाबळेश्वर येथे यात्रा भरते; परंतु मागील वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे १० ते १२ मार्च या कालावधीत श्री महाबळेश्वर हे मंदिर भाविकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांनी दिली.

महाशिवरात्रीला दरवर्षी क्षेत्र महाबळेश्वर येथे वार्षिक यात्रा भरते. या दिवशी श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने तसेच ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. श्री महाबळेश्वरच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. कोरोनामुळे गेल्या वर्षी ही यात्रा रद्द केली होती; परंतु यंदाही कोरोनाचा धोका टळला नाही. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्टने बैठक घेऊन यंदाही महाशिवरात्रीला मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

क्षेत्र महाबळेश्वर येथे पाच नद्यांचे उगमस्थान आहे. या स्थानावर पंचगंगा मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरात पाच नद्यांचे पाणी नंदीच्या मुखातून एका दगडी कुंडात पडते. श्री महाबळेश्वराच्या दर्शनाला जाण्यापूर्वी या कुंडात स्नान करून भाविक श्री महाबळेश्वरच्या दर्शनासाठी जातात. त्यामुळे या मंदिरातही भाविकांची गर्दी होते. याशिवाय महाबळ व अतिबळ यांचीही मंदिरे आहेत. श्री कृष्णामाईचेही पौराणिक मंदिर येथे आहे. अशी सर्व मंदिरे भाविकांसाठी बंद राहणार आहेत.

चौकट :

भाविकांसाठी ऑनलाईन दर्शन

महाशिवरात्र ही गुरुवार, दि. ११ रोजी आहे; परंतु बुधवारपासूनच पुढील तीन दिवस हे मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहीती तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांनी दिली. या काळात सर्व नित्यनियमाने होणारे धार्मिक विधी पार पडतील. महाशिवरात्रीला या मंदिरात विश्वस्तांच्या उपस्थितीत सर्व धार्मिक विधी पार पडणार आहेत. सकाळी व सायंकाळी श्री महाबळेश्वराच्या होणाऱ्या आरतीला भाविकांना ऑनलाईन उपस्थित राहता येणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही चौधरी-पाटील यांनी केले आहे.